• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
23 Aug 2017

एमपीसी न्यूज – आत्तापर्यंत तुम्ही बरीच लग्न पाहिली असतील पण एखाद्या खड्डयाचे चक्क बांधकाम विभागाशी लग्न झालेले तुम्ही पाहिलय का? बांधकाम विभागाचे खड्ड्यांशी असलेले प्रेम पाहता हे लग्न लावून देण्याचा विचार कामशेतच्या युवक काँग्रेसने केला आहे. त्यानुसार उद्या (दि.24) ठीक अकरा वाजता हा सोहळा पार पडणार आहे. 

हा विवाह आहे महाराष्ट्र राज्यशासनाचे कनिष्ठ चिरंजीव वडगाव मावळचे बांधकाम विभाग खाते तर मावळातील सर्व रस्त्यांची कनिष्ठकन्या खड्डेताईचा अशा अगळ्या वेगळ्या सोहळ्याची पत्रिका व पाहुणे मंडळीपण हटकेच आहेत. पत्रिकेच्या सुरुवातीलाच त्यांनी खड्ड्याचे व वडगाव मावळच्या बांधकाम विभागाचे नातेसविस्तर सांगितले आहे. अर्थात हा प्रेम विवाह आहे. यामध्ये रस्ते तयार झाले नाही तोपर्यंत तेथे खड्डे तयार होतात. बांधकाम विभाग व खड्डेताई एक क्षणसुद्धा एकमेंकाशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यातील हे प्रेम पाहता हा विवाह लावून देण्यात येणार असल्याचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

हा विवाह वधूवराच्या निवासस्थानी म्हणजे कामशेत येथील शिवाजी चौकाच्या मध्यस्थानी उद्या गुरुवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. या विवाहाचेमध्यस्थ बांधकाम विभागाचे सर्व ठेकेदार मंडळी आहेत. तर नुसतीच लुडबूडमध्ये खडी, वाळू, सिमेंट, मुरुम असे छोटे निमंत्रक असणार आहेत.

प्रमुख निमंत्रक म्हणून मावळ तालुक्यातील काँग्रेस, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असणार आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थिती लावून लग्नाची शेभा वाढवावी व वधूवरास पुढील संसारासाठी आशीर्वाद द्यावेत असे निमंत्रण निमंत्रकांनी दिले आहे.

Page 2 of 2
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start