• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
13 Sep 2017

Pune : आता हवाई मालवाहतूक पुण्यातून

हवाई मालवाहतूक केंद्राचे पुणे आंतरराष्ट्रीय विमान तळावर उद्घाटन 

एमपीसी न्यूज : पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाच्या पुढाकाराने पुण्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ व्हावा. यासाठी नव्याने हवाई मालवाहतूक केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन सीमा शुल्क मुख्य आयुक्त ए. के. पांडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पुणे शहराची ओळख झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाव आहे. पुण्यात हवाई मालवाहतूक केंद्र नसल्यामुळे पुण्यातील व्यापाऱ्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळावरून व्यापार करावा लागत होता. त्यामुळे नाशवंत वस्तूचा व्यापार करणाऱ्या व्यपाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोड द्यावे लागत होते.

पुणे व आसपासच्या परिसरातील फुले-फळे, भाजीपाला पिकविणारे शेतकरी आणि व्यापारी यांची मागील अनेक दिवसांपासूनची ही मागणी होती. त्यामुळे विविध निर्यातदार संघटना तसेच मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स यांनी देखील हवाई मालवाहतूक केंद्राची स्थापना पुण्यात करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्या धर्तीवर पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाच्या पुढाकाराने आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता पूर्व देशात पुण्यातून थेट व्यापार करणे शक्य होणार आहे आणि यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. व्यापारी वर्गाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.