• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : नोटबंदीनंतर पुण्यातून किती काळा पैसा बाहेर पडला?

पहावी लागेल दोन वर्षे वाट, मुख्य प्राप्तिकर आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी लागू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा आणि अघोषित संपत्ती उघड होईल, असा अंदाज केंद्र सरकारकडून लावण्यात आला होता. तसेच ज्या व्यक्तीकडे अघोषित संपत्ती आहे, त्यांनी ती जाहीर करावी यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजनाही जाहीर केल्या होत्या. सरकारच्या या सर्व प्रयत्नानंतर काळ्या पैशासंदर्भातील संपूर्ण माहिती येण्यासाठी अजून किमान दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती आयकर विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्तांची अमरेश चंदर शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या ऐतिहासिक नोटबंदीनंतर देशभरातील करदात्यांमध्ये जवळपास 59 लाखांनी वाढ झाली आहे, तर पुणे विभागात आयकर भरणाऱ्यांची संख्या 8 लाख 43 हजार इतकी वाढली असून आयकर भरण्यात पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. नागरिकांनी 15 सप्टेंबरच्या आधी अग्रीम कर भरावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असेही शुक्ला यांनी सांगितले.

Facebook Google Plus Twitter LinkedIn