• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

नरेंद्र मोदी दलित आरक्षणाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट - रामदास आठवले


रामनाथ कोविंद यांना उद्धव ठाकरेसुध्दा पाठिंबा देतील..

एमपीसी न्यूज - सर्वांना आश्चर्याचा धक्का देत ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी दलित समाजातील रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिली त्यावरून भारतीय जनता पक्ष दलितांच्या आणि आरक्षणाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी पुणे शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके वाजवून आनंद साजरा केला.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, सरकारचा हा निर्णय क्रांतीकारी असून या निर्णयामुळे भारतीय जनता पार्टी दलित, मागासवर्गीय लोकांच्या उत्कर्षासाठी काम करत असल्याचे सिद्ध झाले आहे. इतर पक्षांनीही विरोधाचे राजकारण न करता दलित उमेदवाराला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरेसुध्दा पाठिंबा देतील...

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र यायला पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. तेव्हा मी विलंब न करता त्यांना पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यामुळे जर एखादा दलित व्यक्ती उच्च पदावर जाणार असेल तर शिवसेना त्याला विरोध करणार नाही, असे सांगत रामदास आठवले यांनी राष्ट्रपती पदासाठी उद्धव ठाकरे रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देतील, असा विश्वास व्यक्त केला.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start