• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

ताडपत्री घोटाळा भोवणार कोणाला; अधिका-यांना की पदाधिका-यांना?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील वारक-यांना देण्यात येणा-या ताडपत्री खरेदीत तब्बल साडेसहा लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप, विरोधकांनी केला आहे. दरम्यान, वारक-यांसोबत महापौर नितीन काळजे यांनी 18 एप्रिल रोजी भेटवस्तू देण्याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर 36 दिवस अधिकारी काय करत होते?, तसेच पदाधिका-यांनाही याचा विसर पडला होता. 26 मे रोजी ताडपत्री खरेदीची पहिली निविदा काढली. यामुळे ताडपत्री घोटाळा नेमका अधिका-यांना भोवणार की पदाधिका-यांना भोवणार याची जोरदार चर्चा सध्पा  पालिका वर्तुळात सुरु आहे.  
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारीतील वारक-यांना दरवर्षी भेटवस्तू देण्यात येते. गेल्यावर्षी विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देण्यात आली होती. त्यावेळी विरोधात असलेल्या आताच्या सत्ताधा-यांनी मुर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा 'कांगावा' करत तत्कालीन सताधा-यांवर आरोपांची राळ उठविली होती. सर्वसाधारण सभेत आणि बाहेर आंदोलन केले. तसेच भाजपने  हा भावनिक मुद्दा निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा केला होता. त्याचा राष्ट्रवादीला निवडणुकीत फटका बसला. 
 
पिंपरी पालिकेत महापालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपची सत्ता आली. वारक-यांना कोणती भेट वस्तू द्यायाची याबाबत चर्चा करण्यासाठी18 एप्रिल 2017 रोजी पालिकेत बैठक घेतली होती. यामध्ये वारक-यांना ताडपत्री देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर 36 दिवस अधिका-यांनी वेळकाढूपणाची भुमिका घेतली. तसेच पदाधिका-यांनाही ताडपत्री खरेदीचा विसर पडला होता. 26 मे 2017 रोजी ताडपत्री खरेदीची निविदा ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेऊन काढण्यात आली. त्यामुळे ताडपत्री खरेदीची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली नाही. यामुळे थेट पद्धतीने ताडपत्री खरेदी करण्यात आली. त्यामुळे ताडपत्री घोटाळा प्रकरण अधिकारी कि पदाधिका-यांना भोवणार याची चर्चा सुरु आहे. 
 
यावर्षीच्या आषाढी वारीत दिंड्यांना सप्रेम भेट देण्यासाठी या साडेसहाशे ताडपत्री खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. बाजारभावापेक्षा एक हजार रुपये अधिक प्रत्येक ताडपत्रीमागे देण्यात आल्याने साडेसहा लाख रुपयांचा हा घोटाळा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी हे प्रकरण राष्ट्रवादीवर शेकले होते. यावेळी मात्र हे प्रकरण प्रशासनावर शेकण्याची शक्यता आहे. स्थायी समितीसमोर हा विषय मंजुरीसाठी न येता पालिका आयुक्तांच्या अधिकारात ही थेट खरेदी करण्यात आल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विरोधकांनी लक्ष्य केले आहे. भांडारप्रमुख तथा सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्यावर शेकण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी प्रशासनाला पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे. 
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start