16 Apr 2018

Pune : जिल्हा परिषदेच्या दारात पोतराजांचा खेळ (व्हिडिओ)
एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेत सदस्यांना विश्वासात न घेता राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिफारशीवरून कामे केली जात असल्याचे सांगून जिल्हा परिषदेच्या दारात शिवसेनेकडून आज अनोखे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने पोतराजांना बोलावून त्यांचा खेळ याठिकाणी सादर करत घंटानाद आंदोलन केले.

या आंदोलनाला शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, कुलदीप कोंडे, रमेश कोंडे, शलाका कोंडे उपस्थित होते. पुढील काळातही जिल्हा परिषदेचा कारभार असाच सुरू राहिला तर 13 तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी देवीचा देव्हारा डोक्यावर घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी दिला.

Tagged under

Media

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares