16 Apr 2018

Pune : छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा - अॅड. प्रकाश आंबेडकर (व्हिडिओ)
एमपीसी न्यूज - भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, असे सांगत छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. याप्रकरणी ते गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत.

भुजबळ यांच्या समर्थकांनी त्यांच्या सुटकेसाठी यापूर्वी राज ठाकरे यांची 'कृष्णकुंज'वर भेट घेतली होती. 'आमचा विकास तुरुंगात कोंडला गेला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा नेता नाही,' असे गाऱ्हाणे त्यांनी ठाकरेंसमोर मांडले. त्यावर 'भुजबळ यांना कधीच जामीन मिळायला हवा होता. आता भुजबळ जोडो नाही, तर भुजबळ छोडो आंदोलन झाले पाहिजे', असे राज ठाकरे म्हणाले होते.

Media

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares