• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Lonavala : अकरा लाखांची लाच स्वीकारताना वनपालास रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज- वनविभागाने जप्त केलेला जेसीबी व इतर वाहने सोडण्यासाठी आणि बांधकामासाठी कोणताही अडथळा न करण्यासाठी 11 लाखांची लाच मागणाऱ्या वनपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज रात्री आठ वाजता लोणावळा येथील सिंहगड टेकनीकल इन्स्टिट्यूट येथे करण्यात आली.

विलास बाबाजी निकम, (वय- 49,रा. स.न. 87, प्लॉट नंबर 227, स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी, सुरक्षानगर, हडपसर, पुणे) असे लाच स्वीकारणाऱ्या वनपालाचे नाव आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड टेकनिकल इन्स्टिट्यूटचे प्रशासन अधिकारी म्हणून काम करतात. इन्स्टिट्यूटने खरेदी केलेल्या गट नंबर 316 वर खाजगी वन अशी नोंद सातबारा उताऱ्यावर लागली होती. त्या जमिनीबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता.

त्याबाबत इन्स्टिट्यूट ने उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. नमूद केलेल्या गटात चर खोदकाम करून बांधकाम चालू होते. त्याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राचार्य व इन्स्टिट्यूटवर गुन्हे दाखल करून तेथील जेसीबी व इतर वाहने जप्त केली होती तसेच बांधकाम बंद करण्यात आले होते. आरोपी विलास निकम याने जेसीबी व इतर वाहने सोडण्यासाठी व इन्स्टिट्यूटला बांधकामासाठी कोणताही अडथळा न करण्यासाठी तक्रारदाराकडे 11 लाखांची लाच मागितली होती.

याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा शहानिशा करून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक दत्तात्रेय भापकर पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल किरण चिमटे,  पोलीस नाईक प्रशांत बो-हाडे आणि सहायक पोलीस फौजदार जाधव यांनी केली.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares