• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimpri: शहरात सोमवारपासून एकही अनधिकृत फलक दिसला नाही पाहिजे; स्थायीच्या प्रशासनाला सूचना
अनधिकृत फलकधारकांवर गुन्हे दाखल करा; राजकीय दबावाळा बळी पडू नका

24 तासात अनधिकृत फलक काढा; सोमवारनंतर अनधिकृत फलक दिसल्यास प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षकावर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लागले आहेत. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असून शहराला बकालपणा आला आहे. त्यामुळे अनधिकृत फलकांवर कडक कारवाई करावी. येत्या 24 तासात अनधिकृत फलक काढावेत. फलक धारकांवार गुन्हे दाखल करावेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. तसेच शहरात सोमवारपासून एकही अनधिकृत फलक दिसला नाही पाहिजे, असा कडक सूचना स्थायी समितीने प्रशासनाला दिल्या आहेत. सोमवारनंतर शहरात अनधिकृत फलक दिसल्यास प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जाहीरात फलकाच्या कामाबाबत निविदा काढण्याची सूचना देखील प्रशासनाला करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (गुरुवारी) पार पडली. सभेत शहरातील अनधिकृत फलकाबाबत जोरदार चर्चा झाली. स्थायी समिती सदस्यांनी अनधिकृत फलकाच्या प्रश्नावरुन प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

''गेल्या आठ महिन्यापासून स्थायी समिती अनधिकृत फलकाच्या कामाबाबत निविदा काढण्याची सूचना प्रशासनाला करत आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासन कोणाला पाठिशी घालत आहे. शहराच्या विविध भागात अनधिकृत फलक आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे. त्यामुळे सोमवारपासून अनधिकृत फलकावर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी सांगितले. तसेच फलकांवर कारवाई करताना कोणत्याही सन्माननीय नगरसेवकांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास. त्या नगरसेवकाला आपले नगरसेवक पद रद्द का करण्यात येऊ नये, असे पत्र पाठविण्यात येणार आहे'', असेही त्यांनी सांगितले.

राजू मिसाळ म्हणाले, ''फलकाबाबत पालिकेने धोरण ठरवावे. त्यामुळे पालिकेला उत्पन्न मिळेल. विनापरवाना फलकाला दंड आकारण्यात यावा. अनधिकृत फलक लावणा-यावर देखील कारवाई करण्यात यावी. सोमवारपासून शहरात एकही अनधिकृत फलक दिसला नाही पाहिजे, अशा कडक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत'' तसेच सोमवारनंतर अनधिकृत फलक दिसल्यास प्रभाग अधिकारी आणि बीट निरीक्षकावर कडक कारवाई केली पाहिजे. फलकाचे 'जीआयएस' मॅपिंग करावे. त्यांची नोंद ठेवावी, असे उत्तम केंदळे यांनी सांगितले.