• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Pimpri : पर्यावरण रक्षणासाठी महामेट्रो दक्ष; आधुनिक पद्धतीने होणार वृक्षांचे पुनर्रोपण
एमपीसी न्यूज - सध्या पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गिकांचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कामामध्ये काही वृक्षांचा अडथळा होत आहे. वृक्षांचा अडथळा होतोय म्हणून त्यांना तोडून चालणार नाही. वाढते प्रदूषण व पर्यावरणाचा धोका टाळण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार मोठी झाडे देखील एका जागेवरून दुस-या जागेवर पुनर्रोपित करता येत आहेत. त्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या पर्यावरणासाठी करत महामेट्रोकडून पुणे मेट्रोच्या कामात अडथळा ठरत असलेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

पिंपरी ते हॅरिस ब्रिज दरम्यान महामेट्रोमार्फत एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेनुसार 135 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. झाडांच्या पुनर्रोपणाचे काम अधिक चांगल्या प्रकारे व्हावे म्हणून महामेट्रोने दोन प्रकारचे पुनर्रोपणाचे प्रात्यक्षिक आयोजित केले आहे. त्यामध्ये सर्वसाधारणपणे केले जाणारे पुनर्रोपण आणि दुसरे जागतिक धर्तीवर मान्य केलेले पुनर्रोपण. त्यानुसार दोन्ही प्रकारच्या पुनर्रोपणाचे काम नाशिक फाटा ते खराळवाडी दरम्यान सुरु आहे, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले आहे.

पुणे मेट्रोच्या कामामधील जास्तीत जास्त झाडे वाचवण्यासाठी पुनर्रोपणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. ज्या झाडांना वाचविणे शक्य नाही, अशी झाडे मात्र तोडण्यात येणार आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे पुणे शहराच्या हरितकरणामध्ये तूट पडू नये म्हणून तोडल्या जाणा-या झाडांच्या बदल्यात प्रतिवृक्ष दहा झाडे लावली जाणार आहेत. याशिवाय शहराच्या हरितकरणामध्ये अधिक वाढ व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवड शहर परिसरात किमान तीन हजार तसेच पुणे महानगर परिसराच्या हद्दीमध्ये तीन हजार झाडे लावण्याचा मानस ठेवण्यात आला आहे. पुणे महापालिका वनविभागाच्या पाचगाव, पर्वती, वनविहार (तळजाई) या ठिकाणच्या 10 एकर क्षेत्रावर वृक्षलागवडीसाठी वनविभागाने परवानगी दिली आहे.

आतापर्यंत दोन हजार स्थानिक प्रजातींच्या वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. उर्वरित झाडे डिसेंबर अखेरपर्यंत लावण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये दिघी येथील आर्मी दलाने वृक्ष लागवडीसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. नागरिकांना मेट्रो विभागाच्या कामकाजाची माहिती व्हावी यासाठी संत तुकाराम नगर येथे सहयोग केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात 40 झाडे लावण्यात आली आहेत.

आकुर्डी येथे पाच एकर क्षेत्रावर झाडे लावण्यात येणार असून त्यामध्ये आजवर 125 झाडे लावण्यात आली आहेत. तसेच या जागेत योजनाबद्ध उपवन विकसित करण्याची प्रक्रिया चालू आहे. याअंतर्गत एकूण 600 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मेट्रो लाईनमध्ये सुमारे तीन ते चार वर्षाची 200 झाडे असून त्यापैकी अडथळा करण्या-या 60 झाडांचे पुनर्रोपण पिंपरी येथील गुलाब पुष्प वाटिका येथे करण्यात आले आहे. सहयोग केंद्रात 10 वृक्षाचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

पुनर्रोपण पद्धतीने झाडे लावताना क्रेनच्या साहाय्याने झाडे उचलली जातात. ज्या ठिकाणी लावायची आहेत तिथे नेऊन लावली जातात. या प्रक्रियेचा खर्च जास्त असला तरीही याच पद्धतीने वृक्ष लावण्यात येणार आहेत.

zadee