• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
07 Dec 2017

Akurdi: नियोजित उद्यान बनले समाजकंटकांचा दारुचा गुत्ता !
एमपीसी न्यूज - आकुर्डी येथे पिंपरी पालिका आणि अमृत योजनेअंतर्गत काम सुरु असलेले नियोजित उद्यान समाजकंटकांसाठी राजरोसपणे दारुचा गुत्ता बनले आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मनस्ताप होत असून रात्री बेरात्री तरुणांच्या या ठिकाणी सुरु असलेल्या दारुच्या पार्ट्यांमुळे परिसरातील सुरक्षा धोक्यात आली आहे. येथे पोलिसांनी गस्त घालून या पार्ट्या आणि येथे चालणा-या गैरप्रकारांना आळा घालावा अशी रहिवाश्यांकडून मागणी होत आहे.

आकुर्डी येथे शुभश्री रेसिडेन्शियल या सोसायटीच्या मागील बाजूस नियोजित नानासाहेब धर्माधिकारी उद्यानाचे काम जोरात सुरु आहे. पूर्वी या ठिकाणी कंपनी होती. पुढील काळात महापालिकेने ही जागा ताब्यात घेतली. तेथे पालिकेच्या आणि केंद्राच्या मदतीने अमृत योजनेअंतर्गत उद्यान विकसित करण्याची योजना आखली. त्यानुसार सध्या तेथे उद्यानाचे काम प्रगतीपथावर आहे. याच उद्यानाच्या शेजारील बाजूस पांढरकरनगर ही झोपटपट्टी वसलेली आहे. पूर्वी येथे कंपनी होती. पुढील काळात कंपनी बंद झाल्यामुळे येथे जंगल वाढीला लागले. त्यामुळे येथे शेजारील झोपटपट्टीमधील कोणीही येण्यास धजावत नसे. मात्र नंतर जेव्हा उद्यान विकसित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आणि येथे असलेला झाडोरा तोडून तेथील परिसर स्वच्छ करण्यात आला तेव्हापासून शेजारील झोपटपट्टीमधील लोकांमार्फत या जागेचा राजरोस वापर होऊ लागला. कालांतराने येथे रात्रीबेरात्री तरुणांची वर्दळ वाढली. आणि याचा त्रास शेजारील इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांना होऊ लागला.

यामुळे त्या रहिवाशांमार्फत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. एखाददोन वेळा पोलिसांनी रात्री गस्त देखील घातली. नंतर ही गस्त थांबली. काही वेळा दुपारच्या वेळातदेखील येथे दारुच्या पार्ट्या रंगल्या. पण त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. जेव्हा येथे उद्यानाचे काम जोरात सुरु झाले तेव्हा दुपारी चालणारे गैरप्रकार आपोआप थांबले. पण एक वेगळीच डोकेदुखी येथील रहिवाशांच्या माथी लागली. या उद्यानाच्या सीमाभिंतीचे काम करण्यात आले आहे. मात्र ही सीमाभिंत झोपडपट्टीच्या बाजूस उघडीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आता झोपटपट्टीमधील रहिवासी या उद्यानाची राजरोसपणे त्यांच्या नैमित्तिक व्यवहारांसाठी वापर करीत आहेत. कारण त्यांना या उद्यानात येण्यासाठी, तेथे कपडे वाळत घालण्यासाठी भिंतीत जागा ठेवली आहे. ती जागा बंद केल्यास हे गैरप्रकार आपोआप थांबतील.

याबाबत बोलताना उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कांबळे म्हणाले, ''झोपडपट्टीतील नागरिक परिसरातील रहिवाश्यांना त्रास देत आहेत. त्यासाठी पालिका सीमाभिंत पूर्णपणे बांधणार आहे. सोमवारपासून भिंतीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल. भिंत बांधल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही''.

निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले म्हणाले, ''आकुर्डी परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या चालू दिल्या जाणार नाहीत. या परिसरात दररोज पोलीस राऊंड मारतील. गस्त वाढविली जाईल. पार्ट्या आणि येथे चालणा-या गैरप्रकारांना आळा घालण्यात येईल''.

स्थानिक नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, या परिसराची मी स्वत: पाहणी केली आहे. त्याठिकाणी उद्यान आणि स्थापत्य विभागाला भिंत बांधण्यासाठी रितसर पत्र दिले आहे. लवकरच सीमाभिंत बांधण्यात येणार आहे.

bottle 1

bottle 2