• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jul 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग एनएमआयईटी महाविद्यालयात रिलायन्स जिओ कंपनीतील पदांसाठी रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील 5325 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केली होती. तसेच ऐनवेळी सुमारे 1200 विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी झाले होते. 11 ते 14 जुलै पर्यंत रिलायन्स जिओ कंपनीच्या 25 अधिका-यांनी या विद्यार्थ्यांच्या गटचर्चा व मुलाखती घेतल्या. यामध्ये कॉम्प्युटर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स टेलीकम्युनिकेशन या शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या 127 विद्यार्थ्यांना पुढील मुलाखतीसाठी पत्र देण्यात आले असल्याची माहिती पीसीईटीच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

हा रोजगार मेळावा संचालक डॉ. गिरीश देसाई, एमएनआयईटीचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. प्रा. राहुल मिश्रा, प्रा. गुरप्रित भट्टी, प्रा. सुनीता शेकोकर, प्रा. आर.जी.बिरादार, प्रा. वैभव पुकळे, प्रा. शिल्पा सोनवणे, प्रा. सोनाली कुलकर्णी व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग या महाविद्यालयाच्या अंतीम वर्षांतील 50 विद्यार्थ्यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

18 Jul 2017

एमपीसी न्यूज - आपली आवड जोपासत ज्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारू शकतो असे क्षेत्र वेळीच निवडावे. आवडीच्या क्षेत्रात करिअर केले तर आपली आवड जोपासली जाईल आणि उत्पन्नाचे साधनही मिळेल, असा सल्ला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मा‍वळातील विद्यार्थ्यांना दिला.

शिवसेनेचे मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी व कै. शंकरराव मोरे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी लोणावळा शहर शिवसेना व कै. उमेशभाई शेट्टी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित मावळातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभानिमित्त रावते यांनी लोणावळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश केदारी, म‍ावळचे उप तालुकाप्रमुख सुरेश गायकवाड, माजी नगरसेविका सौम्या शेट्टी, प्रशांत शेट्टी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, संतोष गुप्ता, पुष्पलता अनसुलकर, शिलाताई खत्री, बबनराव अनसुलकर, बबन खरात, मुन्ना मोरे, जितेंद्र राऊत, सुनील इंगूळकर, संजय घोंगे, मारुती खोले, शंकर शिर्के, गणेश भोकरे, विशाल हुलावळे, सचिन वाळके आदी उपस्थित होते.

माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे तसेच शिक्षणाचे क्षेत्रही व्यापक झाले आहे. याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. भविष्य घडविण्याची एक उपजत शक्ती प्रत्येकाकडे असते याकरिता मुलांच्या आवडीनुसार त्यांचे करियर निवडू द्यावे असे उपस्थित पालकांना रावते यांनी आवाहन केले. आज देशात सुशिक्षित बेरोजगारी वाढली असल्याने रुळलेल्या वाटांनी न ज‍ाता तांत्रिक शिक्षणाची कास धरा असे देखिल रावते यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

गुणवंत विद्यार्थी व शाळांचे शिक्षक यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र खराडे यांनी केले तर जितेंद्र राऊत यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमासाठी कुलदीप लोहर, लक्ष्मण दाभाडे, शहराध्यक्ष दिनेश विर, संघटक हेमंत मेणे, महिला आघाडीच्या तालुका संघटक शिला खत्री, अक्का पवार, तावरे ताई, अनिता गोणते, नरेश घोलप, दिलीप गायकवाड, नरेश काळवीट, युवासेनेचे अजय ढम, ओंकार खराडे, भावेश खराडे, यशोधन शिंगरे, प्रसाद खोले, निलेश कशाळे, शंकर जाधव, अनिल कालेकर, इंद्रजित तिवारी, सुनिल येवले, बाळु लोहर, सुरेश गुप्ता, कैलास सगळे, नागेश चव्हाण, सुरेश गुप्ता, राजु शेलार, सुनील मोरे, अनिल ओव्हाळ, सुरेश टाकवे, दीपक हुंडारे, आशीष ठोंबरे, संतोष शिंदे, अंकुश सातकर, अनंता आंद्रे, ज्ञानदेव जांभुळकर, बबनराव अनसुरकर, राजु चव्हाण, राजु कंभार, शामबाबु वाल्मिकी आदी उपस्थित होते.

18 Jul 2017

एमपीसी न्यूज - मावळ परिसर भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. इंद्रायणी हे वाण इथे प्रामुख्याने घेतले जाते. तसेच फुले समृद्धी, पवना यांचेही काही प्रमाणात पीक घेतले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीला आलेला पाऊस काही काळ शांत झाला होता. परंतु जुलै महिन्याच्या दुस-या आठवड्यात पावसाने जसा वेग धरला तसा भात लागवडीनेही वेग धरला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असून भात लागवडही त्याच बेताने सुरु आहे.

चालू आठवड्याच्या शेवटपर्यंत भात लागवडीचाही शेवट होईल अशी माहिती धामणे येथील शेतकरी अमित गायकवाड यांनी दिली. पीक चांगले यावे याकरिता यंदा शेतक-यांनी भात लागवडीकरिता चार सूत्री तंत्रज्ञान वापरले आहे. ही चारसूत्री शेतीतंत्रज्ञान सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीचा म्हणजे बी, मजूर व खत यांचा खर्च कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशीर करणारे आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावणारा पाऊस जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा दडून बसला होता. त्यामुळे काही भागातील शेतक-यांनी विद्युत पंपाने पाणी देऊन भाताची लागवड सुरु केली होती. वेळेत लागवड करण्यासाठी शेतकरी ज्यादा पैसे मोजून लागवडीचे काम उरकून घेत होता. परंतु मागील आठवड्यापासून पावसाने जोर धरला असल्याने बळीराजाला चांगले बळ मिळाले आहे. मजुरीचे दर वाढले असल्याने मजुरांची समस्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. हा समतोल राखण्यासाठी शेतातील उत्पन्न चांगले व्हायला हवे, अशी अशाही धामणे गावचे शेतकरी अमित गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

पाऊस चांगल्या प्रकारे पडत असून परिसरातील धरणांमध्ये पाणीसाठी वाढत आहे. वाढता पाणीसाठी आणि मुबलक प्रमाणात पडत असलेला पाऊस यामुळे बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत. भात लागवड करताना पीक व्यवस्थापनाचा अभाव काही ठिकाणी जाणवतो त्यामुळे काही भागात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी होते. मावळ भागातील प्रमुख पीक भात असून भात लागवडीसाठी चारसूत्री तंत्रज्ञान अवलंबले आणि योग्य काळजी घेतली तर उत्पादनात वाढ निश्चित असल्याचे वडगाव मावळ कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. नरेंद्र काशीद यांनी माहिती दिली.

Bhat Pikachi Lagavan06

Bhat Pikachi Lagavan 01

Bhat Pikachi Lagavan

18 Jul 2017

एमपीसी न्यूज - भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वडगाव शहर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना 2 हजार वह्या व ज्येष्ठ नागरिकांना 200 छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

इयत्ता दहावी व बारावी मध्ये सर्वाधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना वह्या व ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दिगंबर भेगडे, तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, भास्करराव म्हाळसकर, अविनाश बबरे, बाळासाहेब घोटकुले, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्या अलका धनिवले, पंचायत समिती सदस्या जिजाबाई पोटफोडे, ज्योती शिंदे, दीपाली म्हाळस्कर, प्रवीण चव्हाण, राणी म्हाळसकर, लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, अरुण लाड, हर्षल होगले, वडगावचे सरपंच संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, भाऊसाहेब ढोरे, नारायणराव ढोरे, दीपक बबरे, महेंद्र म्हाळसकर, अमोल पगडे, बबनराव म्हाळसकर, सोपानराव ढोरे, बाळासाहेब कुडे, अरविंद पिंगळे, बबनराव भिलारे आदी उपस्थित होते.

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप संभाजी म्हाळसकर व अनंता कुडे यांच्या वतीने करण्यात आले. सोमनाथ ढोरे यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र काकडे, शंकर भोंडवे यांनी आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे यांनी केले. आभार शंकर भोंडवे यांनी व्यक्त केले.

vadgaon

18 Jul 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक सचिन टकले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कै. केशवराव टकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वतननगर परिसरात जनसेवा मोफत वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले असून वतननगर डीपी रस्त्यालगत ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे व वृक्षारोपण यानिमित्ताने करण्यात आले आहे.

तळेगाव नगरपरिषदेच्या अध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ नगरसेविका सुलोचनाताई आवारे यांच्या हस्ते या उपक्रमांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, नगरसेवक संग्राम काकडे, अरुण भेगडे, अमोल शेटे, गणेश भेगडे, चंद्रभान खळदे, विभावरी दाभाडे, शोभा भेगडे, कल्पना भोपळे, प्राची हेंद्रे, शुभांगी शिरसाठ, रजनी ठाकूर, शोभा परदेशी, विश्वास देशपांडे, इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणपतराव काळोखे गुरुजी, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष शशिकांत हळदे, मनोज ढमाले, संजय मेहता, राजेश गाडेपाटील, वतननगर गणेश प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

वाचनातून माणूस समृद्ध होतो. वाचनासाठी माफक आणि योग्य साहित्याची गरज असते. ही गरज ओळखून वतननगर परिसरात सचिन टकले यांचे वडील कै. केशवराव टकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जनसेवा मोफत वाचनालय सुरु करण्यात आले. वतननगर डीपी रस्त्यालगत ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे टाकण्यात आले आहेत. वृद्धांना सकाळी संध्याकाळी फिरताना कंटाळा आल्यास या बाकड्यांचा मोठा आधार होणार आहे.

वैष्णवी टकले, वृक्षसमिती सदस्य अरुण कुलकर्णी, सुनील खलाटे, नदीम शेख, शैलेश धर्माधिकारी, अनिकेत अंभोरे, सुधा बनसोडे, योगिता आठवले, प्रज्ञा ससाणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Takle 1

18 Jul 2017

वडगाव मावळ ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरतो. हा बाजार वडगाव रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावाजवळ भरतो. आठवडे बाजार झाल्यानंतर ग्रामपंचायती मार्फत बाजाराच्या ठिकाणी झालेला कचरा उचलण्यात येतो. मात्र मागच्या गुरुवारी आठवडे बाजार भरल्यानंतर झालेला कचरा चार दिवस लोटले तरी अद्याप उचलण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक व जवळपास असणा-या सरकारी कार्यालयांमध्ये येणा-या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वडगाव हे मावळ भागाचे तालुक्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. मावळ तालुक्याची सर्व सरकारी कार्यालये वडगाव येथे आहेत. तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, दस्त नोंदणी कार्यालय असल्या कारणाने इथे रोजच लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कचरा न उचलल्यामुळे बाजार परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. पावसाची सतत धार सुरु असल्यामुळे साचलेला कचरा सडला असून त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. यातून ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा समोर येत आहे.

एकीकडे स्वच्छ भारत अभियान मोठ्या तो-यात राबविले जात आहे. आणि दुसरीकडे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. देशभर स्वच्छतेचा कांगावा करणा-या भाजपची सत्ता वडगाव ग्रामपंचायतीमध्ये देखील आहे. ग्रामपंचातीच्या माध्यमातून स्वच्छतेचे उपक्रम देखील राबविण्यात येतात. परंतु हा प्रकार समोर आल्यानंतर स्वच्छतेचे कार्यक्रम केवळ नावापुरतेच राबविण्यात येतात का; अशी शंका येत आहे. कच-याची दुर्गंधी वरचेवर वाढत असून त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आठवडे बाजार संपल्यानंतर परिसरात पडलेले फळे, भाज्या आणि इतर अवशेष ग्रामपंचायतमार्फत तात्काळ दिरंगाई न करता उचलण्यात यावेत अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Kachra 1

17 Jul 2017
एमपीसी न्यूज - अखिल भारतीय सेना मावळ तालुका, जागतिक मानवाधिकार समिती पुणे जिल्हा, पयोनियर हॅास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय सेना पक्ष प्रमुख अरूण गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

 

जागतिक मानवाधिकार समिती पुणे जिल्हाअध्यक्ष प्रदीप नाईक आणि अखिल भारतीय सेना मावळ तालुका संतोष जाचक यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय युवा सेना मावळ तालुका अध्यक्ष चरण ठाकर उपस्थित होते. 

दिवसभर चाललेल्या या आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.
17 Jul 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांनी आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रतियोगीतेत सुवर्णपदक मिळविले आहे. त्यामुळे तळेगावकरांच्या शिरपेचात आणखी एका तुरा रोवला गेला आहे.

फोटोग्राफीक सोसायटी ऑफ अमेरीका, फेडरेशन इंटरनॅशनल दि आर्ट  फोटोग्राफिक, फेडरेशन ऑफ इंडियन फोटोग्राफी यांच्या सयूंक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या वन्यजीव छायाचित्रण स्पर्धेत केवट यांनी हे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत 39 देशाच्या 300 हून अधिक छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता व त्यांनी साधारण 1600 वेगवेगळी छायाचित्रे या स्पर्धेत पाठविली होती. या स्पर्धेसेठी केवट यांनी चार छायाचित्रे पाठवली होती. त्यांचे चारही फोटो स्पर्धेसाठी पात्र ठरले. मात्र, त्यातला जो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला फोटो आहे त्याची कथाही मजेशीर आहे.

केवट यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना ती सांगितली. केवट म्हणाले की, हा फोटो मध्यप्रदेश येथूल पेंच या अभयारण्यातील आहे. यामध्ये जंगलात एक दहा ते 12 एक उंच झाड होते. त्या झाडावर ढोलीमध्ये पोपटांचे एक घरटे होते. त्या घरट्यात पोपटाची तीन पिले होती. ती घोरपडीने खाल्ली पण तिचे पोट एवढे फुगले की ती त्या ढोलीतून बाहेर येऊ शकत नव्हती. त्यामुळे तिने ती पिले खाली ओकली. मात्र तेवढ्या वेळात त्या पिलांचे पालक आले व त्यांनी त्या घोरपडीला बाहेर काढण्यासाठी तिचा पाय ओढायला सुरुवात केली. तोच क्षण मी माझ्या कॅमेरामध्ये टीपला. त्यालाच हे सुवर्ण मिळाले आहे.

या स्पर्धेचा निकाल 21 मे रोजीच लागला होता. तसेच या छायाचित्रांचे दिल्ली येथे 10 व 11 जुलै रोजी प्रदर्शनही भरले होते. मी यावेळीही पेंच अभयारण्यातच होतो. पहाटे तीन वाजता मला मित्राचा फोन आला व त्याने हे सांगितले. मात्र मला विश्वास बसला नाही. मी जंगलात असल्यामुळे मला आधी घरी ई मेल तपासण्यास सांगावे लागले. माझ्या पत्नीने मला सांगितले की मला माझ्या फोटोसाठी सुवर्ण मिळाले. माझा हा पहिला प्रयत्न होता ज्यामध्ये एवढे मोठे यश मिळाले आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या आधी देखील केवट यांना दोन आंतरराष्ट्रीय पारितोषिके व सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या या जागतिक कीर्तीचे व उल्लेखनीय कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आपल्या कष्टाचे फळ या पदकाच्या स्वरूपात मिळाले असे त्यांचे मानणे आहे. या पदकांचे श्रेय ते आपल्या पत्नी स्वाती व आपल्या कुटुंबाला देतात.


goldan medal
   

15 Jul 2017

एमपीसी न्यूज - कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन वर्षांत 12  लाख 53 हजार 500 रुपयांची खंडणी घेऊन पुन्हा 1 लाख 20 हजार रुपयांची खंडणी मागून 1 लाख 73 हजार 500 रुपयांचे धनादेश लिहून घेतल्या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एकाला जामीन मिळाला असून दुस-या एकाला सोमवार (दि.17) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

श्रीकांत आत्माराम शेडगे (वय 30) व निलेश बाळासाहेब भेगडे (वय 35, दोघेही रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि.पुणे ), अशी आरोपींची नावे आहेत. या संदर्भात नवनाथ धोंडीबा म्हसे (वय 34, रा.तळेगाव दाभाडे ता.मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत व निलेश यांनी फिर्यादी नवनाथ म्हसे यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन दि. 27 जून 2014 ते 28 जून 2017 या तीन वर्षांच्या  कालावधीत बळजबरीने प्रतिमहिना 30 हजार रुपये असे एकूण 12 लाख 53 हजार 500 रुपयांची खंडणी घेतली. तसेच पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन 1 लाख 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. आरोपींची घेतलेली इनोव्हा कार त्यांना परत केली असताना आरोपींनी पुन्हा जीवे मारण्याची धमकी देऊन 1 लाख 73 हजार 500 रुपयांचे सिंडिकेट बँक तळेगाव दाभाडे शाखेचे धनादेश लिहून घेतले. आरोपींच्या सततच्या खंडणी मागण्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी म्हसे यांनी अखेरीस तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात 29 जून 2017 रोजी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करम्यात आला आहे.

या प्रकरणी श्रीकांत शेडगे याला सहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. न्यायालयीन कोठडी  भोगल्यानंतर त्याची  जामिनावर सुटका झाली. यातील दुसरा आरोपी निलेश भेगडे याला पोलिसांनी शनिवार (दि.15) रोजी अटक करून वडगाव न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक  तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी सोमवार (दि.17) पर्यंत  पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करत आहे.

15 Jul 2017

एमपीसी न्यूज - वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत आज (शनिवार) रूरबन अंतर्गत गावविकास कृती आराखड्यास मान्यता देण्यात आली.

सरपंच संभाजी म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती वडगाव मावळ यांच्या आदेशानुसार रूरबन कृती आराखड्यास मान्यता मिळविण्याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सरपंच नितीन कुडे, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे, विलास दंडेल, मयूर ढोरे, ग्रामपंचायत सदस्या अंजली बवरे, कल्पना चव्हाण, स्वाती चव्हाण, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, डी. एस. सिरसाट, वडगावमधील नागरिक उपस्थित होते.

रूरबन कृती आराखड्यात गावाच्या विकासासाठी विविध कामांबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये चोवीस तास पाणी, रस्ते, गटारी, पथदिवे, उद्याने, महिला भवन, असे अनेक विषय मांडण्यात आले. सरपंच संभाजी म्हाळसकर आणि ग्रामविकास अधिकारी डी. एस. सिरसाट यांनी रूरबन कृती आराखड्याचे वाचन केले. या ग्रामसभेत अंदाजे 60 कोटी रकमेच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

ग्रामसभेचे प्रास्ताविक सरपंच संभाजी म्हाळसकर यांनी केले. माजी सरपंच नितीन कुडे यांनी आभार व्यक्त केले.

Page 9 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start