• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
03 Aug 2017


एमपीसी न्यूज - मोहम्मद रफी फॅन्स क्लबच्या वतीने स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'यादे रफीकी' या कार्यक्रमांतर्गत रफींनी  गायलेल्या गाण्यांना उजाळा देण्यात आला. येथील लायन्स क्लब हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये  क्लबच्या स्थानिक कलाकारांनी भाग घेतला होता.

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, नगरसेवक अमोल शेटे, नगरसेविका वैशाली दाभाडे, माजी  नगरसेवक चंद्रभानजी खळदे, अशोक काळोखे, सुरेश दाभाडे, डॉ. शाळीग्राम भंडारी, डॉ. अनंत परांजपे, महेशभाई शहा, गोविंदराव खळदे, शंकर भेगडे, स्वेता शहा, विजय काळोखे, लक्ष्मण माने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दीपप्रज्वल व प्रतिमा पूजन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, क्लबचे संस्थापक सूर्यकांत काळोखे, अध्यक्ष भास्कर भेगडे यांच्या हस्ते झाले. स्थानिक  कलाकार  सतीश  देशपांडे, वैशल शाह, शिल्पा देवरूखकर, भास्कर भेगडे, सुभाष वाळुंज, सुरेश  काळे, रमेश जावळे यांनी मोहम्मद रफी यांची गाजलेली गाणी सादर केली. हमजोली व बैराग या चित्रपटातील युगुल गीताने  रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या वसूल करीत 'वन्स मोअर' मिळविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राधेश्याम भंडारी व अनिल धर्माधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ब्रिजेंद्र  किल्लावाला, बाळासाहेब लोणकर, नितीन खळदे, किरण मोकाशी, राजेंद्र जगताप, बाबा चौरे, बशीर पठाण आदींनी केले.

03 Aug 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथून शिवणे गावासाठी सकाळची एसटी नियोजित वेळेपेक्षा 30 ते 40 मिनिटे उशिरा येते. त्यामुळे शिवणे गावातून तळेगावला शाळेसाठी व कामासाठी जाणा-यांची मोठी गैरसोय होत आहे. 

मावळ तालुक्यातील शिवणे गावासाठी तळेगाव येथून सकाळी सात वाजता एसटी सोडण्यात येते. या गाडीने गावातील विद्यार्थी व नागरिक तळेगावकडे जातात. दररोज उशिरा येणा-या एसटीमुळे येथील विद्यार्थ्यांना दररोजच उशीर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

एसटी वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. या समस्येचे निवारण करून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निवेदन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी तळेगाव एसटी आगरप्रमुखांना दिले आहे. लिंकमध्ये तांत्रिक अडचण आल्याने उशीर होत होता, परंतु त्यावर उपाय करून उद्यापासून वाहतूक सेवा वेळेवर पुरवण्याचे आश्वासन तळेगाव आगारप्रमुख माने यांनी दिले.

03 Aug 2017

पंचायत स्थापनेपासूनचे दप्तर झाले अद्ययावत

एमपीसी न्यूज- वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनचे अभिलेख वर्गीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून हा कक्ष अद्ययावत करण्यात आला आहे. त्यामुळे आता जुन्या दस्तऐवजाची मागणी केली असता जुने दप्तर शोधणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला अधिक सोपे जाणार आहे.

वडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासूनचे नमुना एक ते ३३ वर्षनिहाय लावण्यात आले असून विशिष्ट वर्षाचे दप्तर लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगात व्यवस्थितपणे बांधण्यात आले आहे. त्यावर दस्तऐवजाचा तपशील लिहिण्यात आला असून त्या दस्तऐवजांची यादी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे काम अधिक सोपे झाले असून कमितकमीवेळेत जुने दस्तऐवज शोधात येणार आहेत.

शासकीय तपासणी झालेले दस्तऐवज अभिलेख कक्षात ठेवले जातात. त्याचे प्रशिक्षणही संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. या अभिलेख कक्षाची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, गटविकास अधिकारी निलेश काळे, सहायक गटविकास अधिकारी अप्पा गुजर, सी.डी.पी.ओ वासनिक, विस्तार अधिकारी दराडे, कांबळे, थोरात आदींनी केली. यावेळी सरपंच संभाजी म्हाळस्कर, माजी सरपंच नितीन कुडे, ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे, ग्रामविकास अधिकारी डी. एस. शिरसाट आदी उपस्थित होते.

31 Jul 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्याचीच नाही तर पुणे जिल्हा व पुढे सोलापूरची देखील वरदायिनी म्हणून पवना नदीला ओळखले जाते. पवना धरण भरले असल्याने नदीला चांगलेच पाणी आले आहे. मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन आज (सोमवार) करण्यात आले.

यावेळी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, मा. सभापती एकनाथराव टिळे, ज्ञानेश्वर दळवी, माउलीमामा शिंदे, सिंचन विभागाचे उपअभियंता मठकरी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, अजित आगळे, जिल्हा परिषद सदस्य नितिन मराठे, अलका धानीवले, पंचायत समिती सदस्या जिजाबाई पोटफोडे, ज्योती शिंदे, शंकर शिंदे, संदीप भुतडा, बबनराव कालेकर, बाळासाहेब जाधव, शंकर लोखंडे, किसनराव खैरे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, देहूरोड बोर्ड उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, नगरसेवक सुशिल सैंदाणे, गणेश भेगडे, अरूण भेगडे, संग्राम काकडे, अमोल शेटे, देहूरोड बोर्ड माजी उपाध्यक्ष राहुल बालघरे, नगरसेविका शोभा भेगडे, निता काळोखे, रजनी ठाकूर, अमोल नाईकनवरे, रवींद्र माने, आशुतोष हेंद्रे, संजय पवार, गणेश ठाकर आदी उपस्थित होते.

मावळ भागातील डोंगर द-यांमधून वाहत येणारी पवना नदी मावळ भागाची तर तहान भागवतेच पण पुढे जाऊन पुणे जिल्हा आणि उजनी धरणात जाऊन सोलापूरची देखील तहान भागवते. डोंगरांच्या मधोमध अथांग पसरलेल्या पवना धरणाच्या पाण्यावर बळीराजाचा मोठा वर्ग पवनामाईच्या पाण्यावर अवलंबून आहे. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे जलपूजन करण्यात आले.

bhegade

31 Jul 2017


एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने वडगाव मावळ येथील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या नागरिकांना पीठ गिरणी व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

समाजात आर्थिक सुबत्ता वाढावी, लोकांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून नागरिकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जे नागरिक या मदतीसाठी पात्र आहेत, अशांना मदत करण्यात येत आहे. वडगाव मावळ येथे पीठ गिरणी व शिलाई मशीन वाटपाच्या कार्यक्रमात वडगाव मावळचे बाळासाहेब म्हाळसकर, विशाल वाहिले, गणेश ढोरे, विठ्ठल मोहिते आदी उपस्थित होते. 

आर्थिक बाबतीत समाज सक्षम होण्यासाठी यांसारख्या अनेक योजना आहेत. नागरिकांनी त्या योजनांपर्यंत पोहोचायला हवे. योग्य योजनांची माहिती घेऊन त्याबाबत पाठपुरावा केल्यास शासन नक्की मदत करते. मावळ परिसरातील जास्तीतजास्त नागरिकांनी या योजनेचा पाठपुरावा करून लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य बाबुराव वायकर यांनी केले आहे.

31 Jul 2017

एमपीसी न्यूज- नायगाव (मावळ) येथील वारकरी संप्रदायातील व शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा ज्ञानेश्वर लालगुडे (वय 55)  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, दीर नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. तळेगांवचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे यांच्या मेव्हणी व  मावळ तालुका पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय लालगुडे पाटील यांच्या त्या भावजय तर वडगाव खडकाळा गट भाजपा उपाध्यक्ष संदीप लालगुडे यांच्या त्या मातोश्री होत.

30 Jul 2017


एमपीसी न्यूज - नोटा मोजून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने महिलेचे 21 हजार 500 रुपये हातचलाखीने पळवले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता देवराम वाघोले (वय 52, रा. परंदवडी ता. मावळ) यांनी बुधवारी औषधोपचारासाठी तळेगाव स्टेशन येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून 50  हजार रुपये काढले. त्या पैसे मोजत असताना, एका अज्ञात भामट्याने त्यातील पाचशे रुपयांची नोट खोटी असल्याचे भासविले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या 50 हजार रुपयांच्या नोटा मोजून देण्याचा बहाणा केला. त्यातील 21 हजार 500 रुपये हातचलाखी करून भामट्याने  पळविले. 

पुढील  तपास पोलीस नाईक दत्तात्रय हत्ते करत आहे.

30 Jul 2017


एमपीसी  न्यूज - तळेगाव येथे एका 13 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन युवकावर तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी तळेगाव स्टेशन येथील रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या मागे घडली.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्याने जबरीने  विद्यार्थिनीच्या हाताला धरून ओढून रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनच्या मागे नेऊन तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने नंतर घडलेला प्रकार घरच्यांना सांगितल्यावर तळेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे करत आहे.

30 Jul 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील श्री कान्होबा मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते प्रतिक विक्रम भेगडे (पाटील) यांची निवड झाली.

यावेळी श्री कान्होबा मित्र मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे, मंडळाचे आधारस्तंभ संतोष भेगडे, माजी अध्यक्ष व विश्वस्त विनय भेगडे, माजी अध्यक्ष मयुर भेगडे, संदीप सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक भेगडे हे सह्याद्री ग्रुपचे कार्यकर्ते असून तळेगावचे दिवंगत थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील यांचे नातू आहेत. यावेळी प्रतिक भेगडे म्हणाले की, मंडळाचे दरवर्षी गणेशोत्सव, गोकुळ अष्टमी, नवरात्रोत्सव, रंगपंचमी आदी उत्सवांचे कार्यक्रम होत असतात. यावर्षीचा गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक कार्यक्रम, ध्वनी प्रदूषण मुक्त व गुलाल विरहित करणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे -

अध्यक्ष : प्रतिक विक्रम भेगडे पाटील

उपाध्यक्ष : दीपक केशव भेगडे

खजिनदार : आदित्य कैलास भेगडे

सरचिटणीस : ऋषिकेश कैलास दरेकर

चिटणीस : ओंकार संतोष गरूड, शशांक बाळासाहेब टकले

सहखजिनदार: शुभम लक्ष्मण भेगडे, प्रणव शंकर भेगडे

29 Jul 2017

एमपीसी न्यूज- मागील आठवड्यात कलापिनीच्या वतीने एकपात्री अभिनय व नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 175 स्पर्धक सहभागी झाले होते. शिशु गटातील धिटाईने केलेले सादरीकरण कौतुकास्पद होते विषयातील वैविध्यांमुळे स्पर्धा रंगल्या.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ तळेगाव रोटरी सिटीचे नूतन अध्यक्ष रो.शशिकांत हळदे यांच्या हस्ते झाला. या समारंभासाठी कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, कार्यकारिणी अशोक बकरे,रो.प्रतिक मेहता,सौ.अंजली सहस्त्रबुद्धे व्यासपीठावर उपस्थित होते.

‘कलापिनी तळेगावातील सर्वात जुनी व गेली 40 वर्षे सातत्याने नवीन कलाकार आणि कार्यकर्ते तयार करण्याचे कार्य करणारी संस्था आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. रोटरी क्लब तळेगाव सिटीच्या नव्याने सुरु झालेल्या रोटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल कलापिनीचे युवा कलाकार रो.प्रतीक मेहता यांचा कलापिनीच्या वतीने गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनंत परांजपे यांनी तर आभार प्रदर्शन सौ.अंजली सहस्त्रबुद्धे यांनी केले. या स्पर्धांचे परीक्षण तळेगावातील श्रीमती ललिता जोशी व चिंचवडच्या रंगकर्मी डॉ.सीमा निकम यांनी केले. नाट्यछटा सादर करताना आवाजातील चढ उतार, ‘योग्य विषयाची निवड पाठांतर या गोष्टींकडे लक्ष दिल्यास सादरीकरण खुलायला मदत होते आणि हे केवळ प्रशिक्षणानेच होऊ शकते असे डॉ.सीमा निकम म्हणाल्या.
या स्पर्धांचे यशस्वी नियोजन अंजली सहस्त्रबुद्धे व विशाखा बेके यांनी केले तर रामचंद्र रानडे, श्रीपाद बुरसे, रश्मी पांढरे, चेतन पंडित, प्रतीक पाटील, खगेश जोशी, सायली रौंधळ, मुक्ता भावसार, राहुल मुजुमले,प्रतीक मेहता, अनघा बुरसे यांनी सहाय्य केले.
स्पर्धेचा निकाल –
शिशु गट –
प्रथम क्रमांक – ओम सरदेसाई – हर्णेश्वर बाल भवन
व्दितीय क्रमांक – गार्गी लंबाते – जैन इंग्लिश स्कुल.
तृतीय क्रमाक - अरुण कोरडे - जैन इंग्लिश स्कुल.
.1 ली ते 2 री गट –
प्रथम क्रमांक – अन्वय भिडे – बाल विकास विद्यालय
व्दितीय क्रमांक – संस्कार धावने – सरस्वती विद्यामंदिर .
तृतीय क्रमाक - गार्गी महाजन – कांतीलाल शहा विद्यालय
इ.3 री ते 4 थी गट –
प्रथम क्रमांक – अनन्या भेगडे – जैन इंग्लिश स्कुल
व्दितीय क्रमांक – भाग्येश भालेराव – भारतीय जैन संघ .
तृतीय क्रमाक - गौरी कुटे – सेंट माउंट अॅन.
इ. 5 वी ते 7 वी गट –
प्रथम क्रमांक – कार्तिक जगताप – कांतीलाल शहा विद्यालय
व्दितीय क्रमांक – सेजल शिंदे – सेंट माउंट अॅन.
तृतीय क्रमांक - तन्वी भसे – डी.आय.सीज स्कुल.
इ. 8 वी ते 10 वी गट –
प्रथम क्रमांक – सिद्धी शेखर – स्वामी विवेकानंद विद्यालय
व्दितीय क्रमांक – प्रशांत वानखेडे – आदर्श विद्या मंदिर .
तृतीय क्रमाक - राधिका मुळे – जैन इंग्लिश स्कुल.
खुला गट –
सर्वोत्कृष्ट नाट्य छटा – सौ. अनघा बुरसे.
सर्वोत्कृष्ट सादरीकरण – चेतन पंडीत.
सर्वोत्कृष्ट एकपात्री – अनिरुद्ध जोशी

Kalapini 1

Page 5 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start