• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Talegaon : तळेगाव-शिक्रापूर चौपदरीकरणास अठराशे कोटींचा निधी मंजूर


आमदार बाळा भेगडे व आमदार सुरेश गोरेंचा अधिका-यांसमवेत पाहणी दौरा

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण-नाव्हरा-चौफुला चौक या रस्त्याकरिता अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिका-यासोबत आमदार बाळा भेगडे व आमदार सुरेश गोरे यांनी तळेगाव-शिक्रापूर रस्त्याचा संयुक्त पाहणी दौरा केला. पाहणी दरम्यान तळेगाव-शिक्रापूर बाह्यवळण मार्गाचा डीपीआर तयार करून एक महिन्याच्या आत कामास सुरुवात करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी एमआयडीसीचे उपअभियंता भडंगे, ठेंगे, कार्यकारी अभियंता माल्लाबादे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, कार्यकारी अभियंता वाबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता शीतल देशपांडे, प्रकल्प शाखा अभियंता पी.जि.गाडे, भूमी अभिलेख करवंदे व मुसळे, वन विभागाचे अधिकारी तसेच मावळ तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत ढोरे, ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाणे, ज्येष्ठ माजी नगरसेवक गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, जगन्नाथ शेवकर, अरविंद शेवकर, दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, मधुकर ढोरे पाटील, संदीप काशीद आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्राकडे होणा-या मालवाहतुकीमुळे तळेगाव ते शिक्रापूर हा 56 किमीचा पट्टा अति अपघात प्रवण बनला आहे. याकडे आमदार बाळा भेगडे यांनी अधिका-यांचे लक्ष वेधले. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशन परिसरात जड वाहनांच्या वाहतुकीमुळे होणारी सततची वाहतूक कोंडी, सद्यस्थितीत असणारे अरुंद रस्ते, तळेगावची दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या यांसारख्या सर्व बाबी आमदार बाळा भेगडे यांनी अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिल्या. रस्त्यावर आवश्यक तेथे पूल, सहापदरीकरण, चौपदरीकरण आदींबाबतही सूचना देण्यात आल्या.

Facebook Google Plus Twitter LinkedIn