• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Talegaon : मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला शरद पवार सहकार गौरव पुरस्कार


एमपीसी न्यूज - मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवण्यात आला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणारा शरद पवार सहकार गौरव पुरस्कार यंदा मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेला देण्यात आला.

पद्मविभूषण शरद पवार, अर्थमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी सोहळयात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, 51 हजार रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सहकार पणन मंत्री सुभाष देशमुख, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, संचालक बाळासाहेब नेवाळे आदि उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे, उपाध्यक्ष रोहीदास गाडे, सचिव विनायक कदम, खजिनदार महेंद्र ओसवाल, संचालक नंदकुमार शेलार, अविनाश पाटील, सुहास गरूड, रमेश जाधव, राजू खांडभोर, विक्रम कदम, दीपक हुलावळे, पांडुशेठ फलके, शिवाजी असवले, रामदास वाडेकर, बाळासाहेब मोहोळ, राकेश घारे, संतोष कोंढरे, बापूसाहेब दरेकर, संस्थेचे महाव्यवस्थापक संदीप वाळुंज, चंद्रकांत पडवळ, गणेश घारे, विजय शिंदे, विनायक भेगडे, अमोल भेगडे, अनिल आढाळे आदिंनी हा पुरस्कार स्वीकारला.

यापूर्वी संस्थेला कृष्णकांत कुदळे फाऊंडेशनचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार, महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचा आदर्श पतसंस्था पुरस्कार, पुणे पतसंस्था फेडरेशनचा आदर्श पतसंस्था, महाराष्ट्र शासनाचा सामाजिक कार्यगौरव पुरस्कार मिळाला आहे.

Facebook Google Plus Twitter LinkedIn