• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Talegaon : नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन शिक्षकांचा सन्मान

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीतर्फे शिक्षक दिनानिमित्त रोटरी लिटरसी मिशन अंतर्गत 'नेशन बिल्डर अवॉर्ड' देऊन शहर परिसरातील पाच शिक्षकांचा सन्मान केला.

रोटरीचे नियोजित प्रांतपाल रो. रवी धोत्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी दुर्गादेवी ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप जोशी, रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थचे अध्यक्ष रो. सुनील मोडक, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष रो. शशिकांत हळदे, उपाध्यक्ष नितीन शहा, सचिव मनोज ढमाले, रो. हरिश्चंद्र गाडसिंग, दादासाहेब उ-हे, नंदकुमार शेलार, दिलीप पारेख, बाळासाहेब रिकामे, सुनील महाजन, बाळासाहेब भेगडे, भगवान शिंदे, सुरेश शेंडे, रेश्मा फडतरे, शाहीन शेख, राजेश गाडेपाटील, विश्वस कदम, सुभाष दाभाडे, रो. सुरेश फडके, रो. अरविंद नांदे, रो. अशोक मल्होत्रा, रो. कुलदीप दौंड, रो. चंदर खोसला, रो. दीपक रायसोनी, ए. एफ. इनामदार, अभिलाष आव्हाड आदी उपस्थित होते.

इंदोरी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेचे नवनाथ गाढवे, तळेगाव येथील समर्थ विद्यालय शाळेच्या सुजाता कातोरे, मामासाहेब खांडगे स्कूलच्या सुनेत्रा पाठक, नगरपरिषद शाळा क्रमांक सहाच्या संध्या कुलकर्णी, बालविकास विद्यामंदिर शाळेच्या संगीता म्हसेकर या शिक्षकांना 'नेशन बिल्डर अवॉर्ड 2017' ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात दुर्गादेवी चॅरिटेबल ट्रस्टने पुणे जिल्हा ग्रामीण विभागातून दोन सर्वोत्तम शिक्षकांना सन्मानित केले. तळेगाव येथील रेखा परदेशी आणि आंबेगाव येथील एम. डी. मुलाणी या शिक्षकांचा ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्य्क्ष रो. विलास काळोखे यांनी रोटरीच्या माध्यमातून समर्थ विद्यालयातील क्रीडापटूंना रंगीत टी-शर्टचे वाटप केले. सूत्रसंचालन रो. शरयू देवळे यांनी केले. आभार शशिकांत हळदे यांनी मानले.

Facebook Google Plus Twitter LinkedIn