• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Talegaon : कलापिनी संगीत स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी

एमपीसी न्यूज- कलापिनी आयोजित कै. पद्माकर प्रधान स्मृती संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच पूर्ण झाली असून शालेय व युवक गटातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी (दि. १७) आयोजित करण्यात आली असून अंतिम फेरीच्या सर्व स्पर्धकांनी या दिवशी दुपारी तीन वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी शालेय व प्रौढ विभाग मावळ तालुका पातळीवर व युवक विभाग मावळ व पिंपरी चिंचवड विभागासाठी झाली. एकूण 210 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेचे परीक्षण माधव देसाई व स्वप्ना रानडे यांनी केले. स्पर्धेचे 41 वे वर्ष होते.

अंतिम फेरी पुढील रविवारी (दि. 17) दुपारी साडेतीन वाजता कलापिनी सांस्कृतिक केंद्रात होणार असून शालेय (5 वी ते 10वी) व युवक विभागातील ही अंतिम फेरी वाद्यवृंदासह स्वरजल्लोष’’ अशा कार्यक्रमाद्वारे सादर होणार आहे. सर्व गटातील स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अंतिम फेरीनंतर लगेच होणार आहे.

वाद्यवृंदासह तालीम व मार्गदर्शन बुधवारी (दि. 13) व शनिवारी (दि.16) होणार आहे. अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांनी सरावासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.तालमी खेरीज अंतिम फेरीत सहभागी होता येणार नाही. तसेच प्राथमिक फेरीत सादर केलेले गीतच अधिक तयारीनिशी तयार करायचे आहे अशी सूचना आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

यावर्षीपासून प्रेक्षकांनाही स्पर्धानिर्णयात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रेक्षकांनी प्रत्येक गटाच्या स्पर्धेनंतर निर्णयपत्रिका भरून द्यायची आहे. आणि अंतिम निर्णयाशी निर्णय जुळणाऱ्या प्रेक्षकांना परितोषिकही देण्यात येईल.

Facebook Google Plus Twitter LinkedIn