• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
12 Sep 2017

Talegaon : पुणे पीपल्स बँकेच्या संचालक मंडळावर बबनराव भेगडे यांची हॅटट्रीक


एमपीसी न्यूज - पुणे पीपल्स को- आॅप बँक या मल्टिस्टेट बँकेच्या संचालक मंडळाची 2017-2022 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली. यामध्ये बबनराव भेगडे यांची बिनविरोध निवड झाली. बबनराव भेगडे हे बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष असून त्यांची या निवडीबरोबर  पुणे पीपल्स बँकेच्या संचालक मंडळावर हॅट्रिक झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी विशेष सर्वसाधारण सभेत ही घोषणा केली. संचालक मंडळामध्ये अॅड सुभाष मोहिते, बबनराव भेगडे, विजयकांत कोठारी, जनार्दन रणदिवे, सुभाष नडे, बिपीनकुमार शहा, श्रीधर गायकवाड, डाॅ. रमेश सोनवणे, अंबर चिंचवडे, सुभाष गांधी, संजय गुगळे, मिलिंद वाणी, दिलीप दगडे आदींची निवड झाली.

भेगडे यांनी यापूर्वी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर देखील 15 वर्ष काम केले आहे. 1992-97 या काळात भेगडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी कार्यरत होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनचे संचालक, पुणे जिल्हा सहकार बोर्डचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. मावळ तालुक्यातील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक असून मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले आहे.

1952 साली पुणे पीपल्स को-आॅप बँकेची स्थापना झाली. मागील 66 वर्षात 25 शाखा व 1 विस्तारित कक्षासह कार्यरत असलेल्या पुणे पीपल्स बँकेने एकूण व्यवसायात1560 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Facebook Google Plus Twitter LinkedIn