• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
12 Sep 2017

Talegaon : तालुकास्तरीय शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धा उत्साहात


एमपीसी न्यूज - 
जिल्हा क्रीडा परिषद, इंद्रायणी इंग्लिश स्कूल आणि पै. सचिनभाऊ शेळके कुस्ती संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तीन गटात झालेल्या शालेय मुलांच्या
 कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

स्पर्धेचे उद्घाटन तळेगाव नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक सुशील सैंदाणे यांच्या हस्ते झाले. यावेळी तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, सुरेश झेंड, दिलीप कुलकर्णी, श्री बाळासाहेब बाबुराव शेळके एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेळके, संचालक संतोष शेळके, संतोष राक्षे, दत्तात्रय मोहिते, प्रभाकर तुमकर, शाळेच्या मुख्याध्यापिका रंजिता थंपी, रंजना जोशी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये एकूण 85 संघांनी सहभाग घेतला.

बक्षीस वितरण संस्थेचे संचालक व तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप शेळके, संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेळके, संचालक संतोष शेळके, मावळ तालुका क्रिडा संघटनेचे अध्यक्ष शरद इसकांडे, पत्रकार प्रभाकर तुमकर, संचालक संजय शेळके, शाळेच्या मुख्याध्यापिका रंजिता थंपी, रंजना जोशी, फियोना मेंडोसा यांच्या हस्ते करण्यात आले होते.


14 वर्षाखालील मुलांच्या गटात 
इंद्रायणी इंग्लिश स्कूल तळेगाव संघाला विजेतेपद मिळाले तर नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव संघाला उपविजेतेपद मिळाले. या गटात सचिन शहा व देवेश भालेकर या दोन विद्यार्थ्यांना (विभागून) उत्कृष्ठ खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

17 वर्षाखालील मुलांच्या गटात स्वामी विवेकानंद विद्यालय तळेगाव संघाला विजेतेपद मिळाले तर जैन इंग्लिश स्कूल तळेगाव संघाला उपविजेतेपद मिळाले. या गटात आकाश दोहिरे उत्कृष्ठ खेळाडू ठरला.

19 वर्षाखालील मुलांच्या गटात बाल विकास विद्यालय तळेगाव संघाने विजेतेपद पटकावले तर पंडीत नेहरू विद्यालय कामशेत संघाला उपविजेतेपद मिळाले. या गटात ओंकार जोशी उत्कृष्ठ खेळाडू ठरला.

स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रिडा शिक्षक गोरख काकडे, महादेव माळी, महादेव खरटमल, विशाल मोरे, सुनील खंडाळे, सुधीर शिवेकर, नितीन वैरागर, अस्पाक मुलाणी, विजय जाधव, कुणाल कोकरे आदी क्रिडा शिक्षकांनी काम पाहिले. 

स्पर्धेचे नियोजन इंद्रायणी इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापक विशाल मोरे, क्रिडा शिक्षक गोरख काकडे, सुनील खंडाळे यांनी केले.

Facebook Google Plus Twitter LinkedIn