10 Jun 2018

Talegaon Dabhade: सर्वत्र ‘तळेगाव दाभाडे’ नामोल्लेख करावा: दाभाडे राजघराण्याची जिल्हाधिका-यांंकडे मागणी

एमपीसी न्यूज : सरसेनापती दाभाडे राजघराणे संस्थान पूर्वकाळापासून तळेगाव दाभाडे याच नावानी ओळख आहे. परंतु, सध्या महामार्ग, रेल्वे स्थानक अशा अनेक ठिकाणी फक्त तळेगाव असा उल्लेख केला जातो. त्याबाबत तळेगाव दाभाडे असा पूर्ण नामोल्लेख सगळीकडे करावा, अशी मागणी सरसेनापती दाभाडे राजघराण्याच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली .

या संदर्भात जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरसेनापती श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे, श्रीमंत दिव्यलेखाराजे दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप नाईक, स्मिता रानभरे, वर्षा चस्कर आदी उपस्थित होते. 

सरसेनापती दाभाडे राजघराणे संस्थान पूर्वकाळापासून, नंर ब्रिटिशकाळात आणि महाराष्ट्र गँझेटमध्ये देखील तळेगांव दाभाडे आशीच मान्यता आहे. परंतु, सध्या सगळीकडे नुसते तळेगाव उलेख होत आहे. त्यामुळे सगळीकडे तळेगाव दाभाडे असा नामोल्लेख करावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिका-यांसह उपजिल्हाअधिकरी राजेंद्र मूठे, तहसीलदार रणजीत देसाई, नायब तहसीलदार सुनंदा भोसले –पाटील यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे 

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares