• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Maval : पवना परिसरातील कृषी पर्यटन व्यवसाय बंद होण्याची टांगती तलवार ?

पवना धरणशाखेकडून अतिक्रमण काढणेसाठी नोटीस आल्याने कारवाई होऊ नयेबाबत म्हणून लोकप्रतिनिधीना साकडे घालणार

एमपीसी न्यूज- पवना प्रकल्पात बाधित झालेल्या खातेदारांची वारस पवना धरणासाठी संपादित केलेल्या परंतु वापरात न आलेल्या जागी शेती करायचे परंतु याभागात पर्यटकांची संख्या वाढत आहे, शेती आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने कृषी पर्यटन केंद्र सुरू केली आहेत. याठिकाणी ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने पर्यटकांना उपलब्ध करून दिले आहे. याचबरोबर परिसरातील गड किल्ले, लेणी, धरणपरिसर पर्यटकांना मोहित करतो यामुळे येथील अर्थकारणाला चालना मिळाली आहे याठिकाणी आल्याने शहरापासून दूर गेल्याचा आंनद मिळतो यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक मोठ्यासंख्येने येतात. नुकतीच पाटबंधारे विभागाकडून या सर्व कृषी पर्यटन केंद्र मालकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे पवना परिसरातील कृषी पर्यटन व्यवसाय बंद होण्याची टांगती तलवार येथील व्यावसायिकांच्या डोक्यावर अली असून त्याबाबत कारवाई होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधीना साकडे घालण्यात येणार आहे.

पवना धरणासाठी या भागातील 19 गावे,वाड्या वस्त्या, तील 1203 खातेदारांची जमीन प्रकल्पात गेली यातील 340 खातेदारांना खेड, चाकण, आंबी, याठिकाणी प्रत्येकी 4 एकर जमीन देऊन पुनवर्सन केले. परंतु उर्वरित 863 खातेदार अद्याप पुनर्वसनापासून वंचित आहेत. अनेक वर्षांपासून पुनर्वसन होत नसल्याने सन 2013 साली मुंबई उच्चन्यायालात याचिका दाखल केली यात पवना धरणासाठी अतिरिक्त जमीन संपादित केली आहे ती मूळ मालकांना द्यावी ज्याप्रमाणे 340 खातेदारांना 4 एकर जमीन दिली त्याच पद्धतीने उर्वरित खातेदारांना 4 एकर जमीन देऊन पुनवर्सन करावी ही मागणी न्यायालयात केली आहे.

नुकतीच पाटबंधारे विभागाकडून या सर्व कृषी पर्यटन केंद्र मालकांना अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीस दिली असून या केंद्रावर कारवाई केल्यास धरणग्रस्त कुटुंबातील तरुणांचा रोजगार बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीना भेटून मदतीसाठी साकडे घालणार असल्याचे या तरुणांनी सांगितले.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares