• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Vadgaon Maval : मावळ पंचायत समितीमध्ये रोजगार मेळावा


एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील युवक-युवतींसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण व रोजगार मेळावा पंचायत समितीमध्ये संपन्न झाला.

रोजगार मेळाव्याचे उदघाटन पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती शांताराम कदम, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे, साहेबराव कारके, ज्योती शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर भोसले, गट विकास अधिकारी निलेश काळे, विस्तार अधिकारी एम. एच. पाटील, एस. डी. थोरात, गट समन्वयक सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.

मेळाव्यामध्ये ठाणे येथील प्रॉलिफीक, चाकण येथील श्री टेक्नॉलॉजी, पुणे येथील आयसीए स्किल्स प्रा. लि., अपोलो मेडस्कील्स, खेड शिवापूर येथील मॅनपॉवर इत्यादी प्रशिक्षण व नोकरी देणा-या संस्था प्रतिनिधींनी कौशल्य विकास व रोजगार अंतर्गत उपलब्ध असणारे प्रशिक्षण व नोकरीची संधी याबाबत इच्छुक युवक-युवतींनी नाव नोंदणी करावे असे आवाहन करण्यात आले. या कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिशियन, डेटा ऑपरेटर, कॉम्प्युटर नेटवर्किंग, सिक्युरिटी सुपरवायझर, हॉटेल मॅनेजमेंट, कुरिअर व लॉजिस्टिक, इन्व्हेंटरी क्लार्क, अकाउंट असिस्टंट, नॉन व्हाईस, बीपीओ, रिटेल सेल्स पर्सन व इतर प्रशिक्षणाचे कोर्स उपलब्ध आहेत.

वरील सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींना नोकरीची हमी देण्यात आली. मेळाव्यासाठी 350 युवक-युवती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका समन्वयक नंदकुमार वडेकर,  सुनील बुरकुले, प्रथमेश भोसले आदींनी परिश्रम घेतले.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares