• mahesh_kale_1250by200.jpg
11 Jan 2018

Indori : जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची - अर्चना घारे


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने इंदोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला फर्निचर लोकार्पण

एमपीसी न्यूज - जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता मागील काही वर्षांपासून अन्य माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत चांगलीच वाढलेली पाहायला मिळत आहे. थोड्या अधिक फरकाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा नवनवीन उपक्रम राबवत आहेत. शाळेच्या विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि माजी सभापती विठ्ठलराव शिंदे यांच्या वतीने यांच्या वतीने इंदोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला फर्निचर देण्यात आले. या फर्निचर लोकार्पण कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या ज्योती शिंदे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी सरपंच मधुकर ढोरे, संदीप काशीद, दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, रामचंद्र ढोरे, जगन्नाथ शेवकर, रमेश घोजगे, प्रशांत भागवत, प्रदीप काशिद, दिलीप ढोरे, अरविंद शेवकर, आशिष ढोरे, नंदकुमार ढोरे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भागवत सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

अर्चना घारे पुढे म्हणाल्या की, "अनेक उत्साही व होतकरू शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढवत आहेत. त्यांना योग्य माध्यमाची जोड मिळाली तर शाळांचा आणखी विकास होईल. डिजिटल क्रांती सध्या सर्वच क्षेत्रात होत आहे, तिचा वापर करून विद्यार्थ्यांना टेक्नोसेव्ही करण्याचा प्रयत्न देखील बहुतांश प्रमाणात होत आहे"

इंदोरी जिल्हा परिषद शाळेला कपाट, टेबल, खुर्च्या याप्रकारचे शालेय फर्निचर साहित्य देण्यात आले. कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच कीर्ती पडवळ, उपसरपंच अंकुश ढोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत तालुक्यातील विजेत्या लेझीम संघाने केले. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी प्राथमिक शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठ्ठल चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सचिन ढोबळे यांनी केले तर आभार ज्योती हिवराळे यांनी मानले.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares