• mahesh_kale_1250by200.jpg
11 Jan 2018

Kamshet: दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून पत्नीचा खून करून पती फरार


एमपीसी न्यूज- दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून पतीनेच आपल्या पत्नीचा खून केला आहे. ही घटना आज (गुरुवारी)सकाळी दहा वाजता कामशेत येथील इंद्रायणी कॉलनी येथे घडली आहे.


रुपाली हिरामण कांबळे (वय 35 रा इंद्रायणी कॉलनी कामशेत) असे मृत पत्नीचे नाव असून आरोपी पती हिरामण बसप्पा कांबळे हा फरार आहे.याप्रकरणी सचिन मोहन साळवे (वय 28 रा.खंडाळा) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी साळवे हे रुपाली यांचे भाऊ असून. रुपाली या पती आणि आपल्या दोन मुलांसमवेत कामशेत येथे राहत होत्या. हिरामण याला दारू पिण्याचे व्यसन होते. हिरामण हा रुपाली यांना दारूसाठी पैसे मागून सतत मारहाण करत असे. 

आज सकाळी नऊ वाजता पती-पत्नीमध्ये दारूच्या पैशावरून भांडण सुरू होते. यावेळी हिरामण याने डोक्यात कश्याच्या तरी साहाय्याने वार केला या मध्ये रुपाली यांचा मृत्यू झाला. ही सारी हकीकत मुलगा कुणाल याने सचिन याना फोन करून सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान हिरामण हा घरातील आपले कपडे घेऊन फरार झाला.

कामशेत पोलीस ठाण्यात हिरामण याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून कामशेत पोलीस पुढील तपास करत आहेत.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares