• mahesh_kale_1250by200.jpg
11 Jan 2018

Kamshet : रेल्वेच्या धडकेत 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; रुळाजवळ लघुशंका करणे बेतले जिवावर


एमपीसी न्यूज - रेल्वेरुळ ओलांडणे किंवा रेल्वेरुळावर स्टंट करणे जेवढे महागात पडु शकते तेवढेच रेल्वे रुळाजवळ लघुशंका करणे देखील जीवावर बेतू शकते.  अशाच प्रकारात कामशेतजवळ आज (गुरुवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास  एका 45 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.


कामशेत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नितीन जनार्दन फाळके (वय 45 रा. वळकाईवाडी, लोणावळा)  असे मृताचे नाव आहे.

नितीन हे पुणे-मुंबई महामार्गाच्या कडेला दुचाकी लावून लघुशंकेसाठी रुळाजवळ आले असता रेल्वेची त्यांना धडक बसली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्तरांनी त्यांना मृत घोषित केले. 

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares