• mahesh_kale_1250by200.jpg
11 Jan 2018

Talegaon : कात्रज-वडगाव मावळ मार्गावर बससेवा सुरु करा अन्यथा तुकाराम मुंढेंचे निलंबन करा


मानव अधिकार संघटनेची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज - तळेगाव-मनपा आणि वडगाव मावळ-कात्रज मार्गावर पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत सुरु करण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील प्रशासनाकडून त्यावर कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही. पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला असता, त्यांनीही याबाबत कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे नागरिकांची असुविधा होत आहे. यामुळे तुकाराम मुंढे यांचे निलंबन करावे, अशी मागणी मानव अधिकार संघटनेने केली आहे.

मानव अधिकार संघटनेच्या वतीने मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे आणि मावळ तालुका आमदार संजय भेगडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश मानव अधिकार सचिव प्रदीप नाईक, शिवसेना मावळचे नेते सुनील मोरे, मावळ तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे नामदेव भागुजी डफळ उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, "पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव व पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम तसेच अन्य अधिका-यांकडे वडगाव मावळ ते कात्रज आणि मनपा ते तळेगाव या मार्गावर बससेवा सुरु करण्यासाठी वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. तसेच 27 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी वडगाव मावळ तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण देखील केले. तरीही प्रशासनास जाग आली नसून त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधून त्यांनी याविषयी कसलेही गांभीर्य दाखविले नाही. तळेगाव आणि वडगाव येथून मनपा, कात्रज भागात जाणा-या नागरिकांचे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे मुंढे यांना संचालक पदावरून निलंबित करावे आणि वडगाव मावळ ते कात्रज आणि तळेगाव ते मनपा मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरु करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares