• mahesh_kale_1250by200.jpg
11 Jan 2018

Talegaon : पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवारी

एमपीसी न्यूज - श्रीरंग कलानिकेतन, तळेगांव दाभाडे आयोजित संगीतभूषण कै. पं. राम मराठे स्मृती राज्य स्तरीयसंगीत स्पर्धा 2018 ची तळेगाव केंद्राची प्राथमिक फेरी रविवारी (दि. 14) कै. अनंतराव चाफेकर सभागृह (शेजार ज्येष्ठ नागरिक संघ) यशवंत नगर तळेगाव स्टेशन येथे होणार आहे. सकाळी नऊनंतर या फेरीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती श्रीरंग कलानिकेतनचे सचिव विनय कशेळकर यांनी दिली. 
 
स्पर्धेमध्ये शास्त्रीय कंठ गायन, सुगमसंगीत गायन, नाट्यगीत गायन तसेच तबला-पखवाज संवादिनी, बांसरी व तंतुवाद्य वादन प्रकार आहेत. या स्पर्धा विविध वयोगटात संपन्न होणार आहेत. प्राथमिक फेरीत प्रत्येक गटातून दोन स्पर्धक निवडले जातील. निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी 20 आणि 21 जानेवारी रोजी तळेगाव येथे संपन्न होणार आहे.  
 
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या स्पर्धकांनी नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी 7507487784 या क्रमांकावर अथवा ईमेल द्वारे (This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.) संपर्क साधावा.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares