• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Talegaon : नूतन तंत्रनिकेतनमध्ये शुक्रवारी जीकेएन ड्राईव्हलाईनचा रोजगार मेळावा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनमध्ये प्रथितयश बहुराष्ट्रीय कंपनी जीकेएन ड्राईव्हलाईन इंडीयासाठी पदविका (डिप्लोमा) इंजिनिअरींग उमेदवारांसाठीचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जून 2017 मध्ये उत्तीर्ण झालेले तसेच मागील वर्षी उत्तीर्ण झालेले मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रॉडक्शन शाखांचे उत्तीर्ण पदविकाधारक विद्यार्थी या मुलाखतींसाठी पात्र असतील. हा रोजगार मेळावा शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता तळेगाव येथील नूतन तंत्रनिकेतनच्या कॅम्पस मध्ये होणार आहे.

अधिक माहितीसाठी प्लेसमेंट ऑफीसर प्रा. ऋषिकेश पांडे यांच्याशी 9604356684 या क्रमांकावर संपर्क करावा. अशी माहिती प्राचार्य शैलेंद्र मोरे यांनी दिली.