• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
06 Dec 2017

Vadgaon Maval : आढे गावाच्या ग्रामसेवकाला दोन हजाराची लाच घेताना अटक

एमपीसी न्यूज - सरकारी अनुदानातून शौचालय मंजूर केल्याच्या बदल्यात तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या वडगाव मावळ येथील आढे गावच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवारी) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली.

परमेश्वर गोमसाळे असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

गोमसाळे हे वडगाव-मावळ येथील आढे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत. तक्रारदाला सरकारी अनुदानातून शौचालय मंजूर झाले होते. शौचालय मंजूर केल्याच्या बदल्यात ग्रामसेवक गोमसाळे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये देण्याची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसबीकडे तक्रार केली होती.

त्यानुसार आज दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक गोमसाळे यांना एसबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.