• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
05 Dec 2017

Kamshet : कान्हेफाटा येथे गुरुवारी शिवसेना पदाधिका-यांची बैठक

एमपीसी न्यूज - शिवसेना युवासेना मावळ विधानसभा प्रमुख पदाधिका-यांची बैठक कान्हेफाटा येथील साईबाबा सेवाधाम संस्थेमध्ये गुरुवार (दि. 7) रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

बैठकीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी दिली. या बैठकीला खासदार श्रीरंग अप्पा बारणे व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांची नुकतीच पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेतेपदी निवड झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा पहिलाच मावळ दौरा असल्याने पक्षाच्या सर्वच पदाधिका-यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.