• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
05 Dec 2017

Talegaon : तळेगाव-चाकण- शिक्रापूर बाह्यवळण महामार्गासाठी 1800 कोटी रुपयांची मंजुरी

तळेगाव-चाकण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करा; आमदार बाळा भेगडे यांचे संबंधित अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिका-यांसमवेत आमदार बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत तळेगाव-चाकण- शिक्रापूर-नाव्हरा- चौफुला चौक या रस्त्याकरिता अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी एम.आय.डी.सी.चे उपअभियंता भडंगे, ठेंगे, कार्यकारी अभियंता माल्लाबादे, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, कार्यकारी अभियंता वाबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंता शीतल देशपांडे, प्रकल्प शाखा अभियंता पी.जि.गाडे, भूमी अभिलेख करवंदे व मुसळे, वन विभागाचे अधिकारी तसेच जि.प.सदस्य नितीन मराठे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सौरभ राव व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान तळेगाव-चाकण रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु करा, या रस्त्यावर आवश्यक तेथे पूल, सहापदरीकरण, चौपदरीकरण या बाबतच्या आवश्यक त्या सूचना आमदार बाळा भेगडे यांनी संबधित अधिका-यांना दिल्या. औद्योगिक क्षेत्राकडे होणा-या मालवाहतुकीमुळे तळेगाव ते शिक्रापूर असा 56 किलोमीटरचा पट्टा अति अपघात प्रवण बनला आहे. याकडे आमदार बाळा भेगडे यांनी अधिका-यांचे लक्ष वेधले.

सदर हायवे हा वडगाव फाटा ते इंदोरी पर्यंत साठ मीटर रुंद व सहा किलोमीटर लांब व तेथून पुढे चाकण पर्यंत तेवीस किलोमीटर साठ मीटर रुंद होणार आहे. या रस्त्यात बरीच बांधकामे येत असल्यामुळे रस्त्याची रुंदी पंचेचाळीस मीटर करावी, सदर कामामध्ये रस्त्याच्या रुंदीमध्ये माझे बांधकाम अडथळा ठरत असले तर ते देखील काढून टाकावे परंतु हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे असे अधिका-यांना सांगितले. ह्या सर्व बाबींचा विचार करून एक महिन्यामध्ये बाह्यवळण मार्गाचा डी.पी.आर तयार करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे बाबतच्या सूचना आमदार बाळा भेगडे यांनी संबधितांना दिल्या.