• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
05 Dec 2017

Maval: आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - बाळा भेगडे

कान्हेफाटा येथे शुक्रवारी आदिवासी मेळावा

एमपीसी न्यूज - आदिवासी बांधवांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. आदिवासी बांधवांनी या शासकीय योजनांचा जास्तीत-जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी केले.

मावळ तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांच्या तालुका स्तरावरील मेळावा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय-घोडेगाव, तहसील कार्यालय-मावळ व इतर शासकीय यंत्रणा यांच्या माध्यमातून आमदार बाळा भेगडे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि. 8) ग्रामीण रुग्णालय, कान्हे फाटा, ता.मावळ, येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मेळावा होणार आहे.

या मेळाव्यामध्ये तालुकास्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांना सक्रीय सहभाग नोंदविणेबाबत सूचित करण्यात आलेले आहे. विशेष करून या मेळाव्यामध्ये आदिवासी बांधवांना रेशनकार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आदिवासी विकास विभागाकडील विविध योजनांची माहिती देणे. तसेच सर्व फॉर्म भरून घेणे. युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण व नोकरी विषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच मावळ तालुक्यातील आदिम जमाती (कातकरी) बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

या एकदिवसीय मेळाव्यास मावळ तालुकास्तरावरील सर्व शासकीय यंत्रणा उपस्थित राहणार आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार बाळा भेगडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.