• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
04 Dec 2017

Vadgaon Maval : वडगाव मावळ ग्रुपग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर


एमपीसी न्यूज - वडगाव मावळ कातवी ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोडत काढून प्रभागनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणामधे बदल करण्यासाठी आज विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ही ग्रामसभा वडगाव मावळ येथील पोटोबा मंदिर येथे पार पडली.


महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या नऊ ऐवजी दहा जागांचे वाटप करण्यात आले होते. जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी सर्वसाधारण प्रवर्गासाठी चिठ्ठयांद्वारे लाॅट काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी चिठ्ठया टाकण्यात आल्या. यामध्ये वाॅर्ड क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण पुरूषाची चिठ्ठी निघाली.

कुडेवाडा, मिलिंदनगर ,टेल्को कॉलनी या भागाचा समावेश वॉर्ड क्रमांक पाचमध्ये होतो.

वॉर्ड क्रमांक पाचमधून अनेक रथी-महारथी ग्रामपंचायतीवर येण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नेते व मावळ तालुका राष्ट्रवादी सहकार आघाडीचे अध्यक्ष सुभाष जाधव, माजी उपसरपंच राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच विशाल वहिले, माजी सरपंच व विद्यमान सदस्य नितीन कुडे, माजी सदस्य दादा कुडे, मावळ तालुका भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष अनंता कुडे, वडगाव शहर शिवसेना उपप्रमुख बाळासाहेब शिंदे, अर्जुन ढोरे आदी सदस्य सध्या तरी इच्छुक असल्याची चर्चा वडगाव मावळ येथे रंगली आहे.

यापूर्वी वॉर्ड क्रमांक पाच मधून शेखर भोसले, राजेंद्र कुडे, विशाल वहिले, नितीन कुडे, दादा कुडे आदींना ग्रामपंचायत सदस्यपदाची संधी मिळाली आहे. परंतु सदस्यपदासाठी आणखी कितीजण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणकोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार व कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे.


IMG 20171204 WA0052