• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
20 Sep 2017

एमपीसी न्यूज - गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मुलांच्या सीबीएसई क्लस्टर नऊ फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या 22-25 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न होणार आहेत. यंदा स्पर्धेचे यजमानपद पिंपरी येथील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलने घेतले आहे. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील आणि गोव्यातील सीबीएसईच्या शाळांमधून 17 वर्षाखालील 79 संघ आणि 19 वर्षांखालील 38 असे एकूण 117 संघ सहभागी होणार आहेत.

पुणे विद्यापीठ, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल, डॉ. हेडगेवार ग्राउंड (पिंपरी), बी. के सेंटर फॉर एज्युकेशन स्कूल ग्राउंड याठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघासाठी ‘नॉकआऊट’ फेरी असलेल्या या स्पर्धेत एका संघाला पुढे जाण्याची एकच संधी मिळणार आहे. विजेत्या शाळांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

19 Sep 2017


एमपीसी न्यूज - मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशालेने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे मनपा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटात पी. डी. ई. एज. इआॅन ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलवर ५० धावांनी मात केली.

बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या पहिल्या लढतीत गोळवलकर प्रशालाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत २ बाद १०० धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ज्ञानांकुर स्कूलला १० षटकांत ७ बाद ५० धावाच करता आल्या. यात अनिश पाष्टेने चार गडी बाद केले.

अपूर्व पंडितचे ४ बळी

वरद जोशीच्या नाबाद ८६ धावा आणि अपर्व पंडितच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर संघाने राजा धनराजगिरजी हायस्कूल संघावर १४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. परांजपे विद्यामंदिरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत बिनबाद १६७ धावा केल्या. यानंतर राजा धनराजगिरजी हायस्कूलला ९.५ षटकांत २२ धावांत रोखले. यात अपूर्वने ४, तर शुभम मोरेने तीन गडी बाद केले.

१७ वर्षांखालील मुले - निकाल -१) मा. स. गोळवलकर गुरुजी प्रशाला - १० षटकांत २ बाद १०० (दुर्वेश टांकसाळे नाबाद १६, हेरंब वैशंपायन नाबाद १८, नागेंद्र चिपकर १-८, पवन ननावरे १-१३) वि. वि. ज्ञानांकुर स्कूल - १० षटकांत ७ बाद ५० (दिनेश मौर्य नाबाद १२, अनिश पाष्टे ४-९).

२) भारतीय विद्याभवन परांजपे विद्यामंदिर -१० षटकांत बिनबाद १६७ (वरद जोशी नाबाद ८६, हर्षल क्षीरसागर नाबाद १९) वि. वि. राजा धनराजगिरजी हायस्कूल - ९.५ षटकांत सर्वबाद २२ (करण कांबळे १०, अपर्व पंडित ४-१, शुभम मोरे ३-०).

३) किलबिल स्कूल - १० षटकांत ३ बाद १०२ (प्रथमेश पवार नाबाद २२, ओम घडशी २१, यश चौधरी १-१७) वि. वि. व्हिक्टोरियस कीड्स एज्युकेशन - १० षटकांत ५ बाद ५८ (सिद्धार्थ जगताप ८, शिवराज कोकाटे ५, तेजस पवार २-६). ४) बिशप्स स्कूल कॅम्प - १० षटकांत ३ बाद ७७ (रिषभ पारेख २३, कौशल तांबे १४, नागेश पालदे १-१३, आशिष ससाणे १-१४) बरोबरी वि. म. ए. सो. भावे स्कूल - १० षटकांत २ बाद ७७ (आशिष ससाणे नाबाद ४४). सुपर ओव्हरमध्ये बिशप्स स्कूल एका धावेनी विजयी.

18 Sep 2017


एमपीसी न्यूज - सेंट व्हिन्सेंट स्कूलने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे मनपा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले. शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस मैदानावर ही स्पर्धा झाली.

स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत सेंट व्हिन्सेंट स्कूलने महंमदवाडीच्या दिल्ली पब्लिक स्कूलवर ४-०ने मात केली आणि विजेतेपद पटकावले. यात लढतीच्या १२व्या मिनिटाला हितेश यादवने वियान मुरगोडच्या पासवर गोल करून सेंट व्हिन्सेंटला आघाडी मिळवून दिली. यानंतर १९व्या मिनिटाला वियान मुरगोडने भार्गव सावंतच्या पासवर गोल करून सेंट व्हिन्सेंटची आघाडी २-० ने वाढवली. लढतीतील २३व्या मिनिटाला फ्रँकलिन नाझरथने दिनेश चंदर्गीच्या पासवर तिसरा, तर ३१व्या मिनिटाला भार्गव सावंतने वियान मुरगोडच्या पासवर चौथा गोल केला. दिल्ली स्कूलला शेवटपर्यंत सेंट व्हिन्सेंटची बचाव फळी भेदता आली नाही.

तत्पूर्वी, उपांत्य फेरीत सेंट व्हिन्सेंट स्कूलने कॅम्पमधील द बिशप्स स्कूलवर ४-०ने मात केली. यात सेंट व्हिन्सेंटकडून फजल शेखने (२, १४ मि.) दोन गोल केले, तर भार्गव सावंत (७ मि.) आणि हितेश यादव (२१ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. जसकर भट्टीच्या (८ मि.) एकमेव गोलच्या जोरावर दिल्ली पब्लिक स्कूलने दुसºया उपांत्य लढतीत पाषाणच्या लॉयला हायस्कूलवर १-०ने मात केली.

मुलींमध्ये सेंट मेरीजला विजेतेपद

या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या गटात सेंट मेरीज स्कूलने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत सेंट मेरीज स्कूलने कॅलम हायस्कूलवर १-०ने मात केली. यात लढतीच्या २४व्या मिनिटाला कॅलम हायस्कूलच्या लियाना फर्नांडिसने हँड केल्यामुळे सेंट मेरीज स्कूलला पेनल्टी मिळाली. यावर सुरभी उपाध्यायने गोल करून सेंट मेरीजला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून सेंट मेरीज स्कूलने विजेतेपद मिळवले. यानंतर पियुषा नरकेच्या (२ मि.) शानदार गोलच्या जोरावर एंजल मिकी अँड मिनी स्कूलने कल्याणीनगरच्या बिशप्स स्कूलवर १-०ने मात करून तिसरा क्रमांक मिळवला.

18 Sep 2017

दोन टायर पंक्चर होऊनही सुपर रॅलीत 20 गुणांची कमाई 

एमपीसी न्यूज-  पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याने आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील होक्कायडो रॅलीत आठ तासांची पेनल्टी बसूनही आशिया करंडक गटात तिसरा क्रमांक मिळविला. एकुण क्रमवारीत तो पंधरावा आला. जपानमधील होक्कायडो बेटावर ही रॅली शनिवारी व रविवारी पार पडली. भारताचा गौरव गील सर्वसाधारण तसेच गटात विजेता ठरला. संजयचा एम्पार्ट संघातील सहकारी रॉबर्ट ब्लाॅमबर्ग गटात दुसरा आला.

या रॅलीची तिसरी स्टेज स्पर्धकांसाठी जणू काही शापच ठरली. संजयसह तब्बल सहा जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे माघार घ्यावी लागली. ओले व्हीएबी याची कार तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. संजयचा सहकारी यारी केटोमा याची कार भरकटली. संजयचा पूर्वीच्या कुस्को संघातील सहकारी मायकेल यंग याच्या कारचे इंजिन बिघडले. यासुशी ओयामा याची कार उलटली, तर यानुनोरी हागीवारा याच्या कारचे ब्रेक फेल झाले. संजयच्या कारचे मागील बाजूचे डावे चाक आधी पंक्चर झाले. ते बदलून त्याने रॅली पुढे सुरु केली, पण जेमतेम २००-३०० मीटर अंतर जाताच मागील बाजूचे उजवे चाक पंक्चर झाले. स्टेपनी एकच असल्यामुळे त्याला माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. पहिल्या लेगमधूनही त्याला माघार घ्यावी लागली. कारचे काही काही नुकसान झाले नव्हते, पण सर्व्हिस पार्कमधून एम्पार्ट संघाचे तांत्रिक पथक वेळेत येऊन त्याला रॅली पुढे वेळेत सुरु करणे शक्य नव्हते.

सुपर रॅली समाधानकारक

संजयला पहिला लेग पूर्ण करता आला नाही, पण त्याने नव्या उत्साहात रविवारी सुपर रॅली भाग घेतला. स्टेजगणिक त्याने समाधानकारक वेग राखला. ओटोफुके रिव्हर्स एक स्टेजला 17वा, न्यू होनबेत्सूला 13वा, न्यू ओशोरो लाँग एकला 12वा, ओटोफुके रिव्हर्स दोनला 15वा, न्यू होनबेत्सू दोनला 12वा अशी त्याची कामगिरी झाली. सॅमो सात्सुनाई या सुपर स्पेशल स्टेजमध्ये त्याने सातव्या क्रमांकावर झेप घेत टाॅप टेनिस फिनीश नोंदविला.

रविवारी दुसरा लेग झाला. त्यात संजय 18 स्पर्धकांत 12 वा आला. त्याने 49 मिनीटे 33.4 सेकंद वेळ नोंदविली. संजयने 5 बोनस गुणांसह एकुण 20 गुणांची कमाई केली. आशिया करंडक गुणतक्त्यात तो तिसरा आहे.
18 Sep 2017

एमपीसी न्यूज - जिल्हा क्रीडा परिषद पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या संघात नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाने कमलनयन बजाज संघावर 2-0 असा विजय मिळविला. या स्पर्धा संत तुकाराम नगर पिंपरी येथे पार पडल्या.

तत्पुर्वी झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये नॉव्हेल संघाने अमृता विद्यालयला 1-0 ने नमविले. नॉव्हेल संघाकडून अश्वथी हरीकुमार व सिद्धी भोर यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. या संघाला क्रीडा शिक्षक महेश नलावडे व क्रीडा शिक्षिका पवित्रा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

नॉव्हेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, कार्यकारी संचालक विलास जेउरकर, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कांचन देशपांडे, विद्यालयाच्या विश्वस्त डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक व्यवस्थापक समीर जेउरकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. तसेच विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.
18 Sep 2017

लायन्स क्लब आॅफ पूनाच्या वतीनेआंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब आॅफ पूनाच्या वतीने आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा फिरता करंडक शिशुगटात डी.एस.के, बालगटात सिंबायोसिस, मध्यम गटात हुजुरपागा तर मोठ्या गटात एंजल मिकी मिनी स्कूल या शाळांनी पटकाविला.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लायन्स क्लब आॅफ डिस्ट्रीक्टचे प्रकल्प संचालक विजय सारडा आणि  रिजन चेअरमन परमानंद शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रेसिडेंट रामकृष्ण अय्यर, स्पर्धेच्या संयोजिका रेखा ठाकोर, सचिव क्षमा शर्मा, तसेच क्लबचे सदस्य विजय डांगरा, अमिता शहा, माधुरी अभंग, रेश्मा दोशी, ललिता मुछाल  उपस्थित होते. विजेत्यांना यावेळी प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्पर्धेचे यंदा 40 वे वर्ष होते. देसाई ब्रदर्स यांचे स्पर्धेला प्रायोजकत्व मिळाले. स्पर्धेमध्ये 50 शाळांमधून 275 विद्यार्थी सहभागी झाले होते.            
18 Sep 2017

शालेय क्रिकेटमध्ये परेश जैसवाल, अथर्व कामठेची हॅटट्रिक

एमपीसी न्यूज - सेंट फ्रान्सिस डी सेल्स स्कूल, सिंहगड सिटी स्कूल यांनी जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महापालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. या स्पर्धेत रविवारी परेश जैसवाल, अथर्व कामठे यांनी हॅटट्रिक नोंदवली.

बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत सेंट फ्रान्सिस स्कूलने मॉडर्न हायस्कूलवर ४५ धावांनी मात केली. सेंट फ्रान्सिस स्कूलने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत ५ बाद १०३ धावा केल्या. परेश जैसवालने हॅटट्रिकसह चार गडी बाद करून मॉडर्न हायस्कूलला ९ बाद ५८ धावांत रोखले. यानंतर झालेल्या दुस-या लढतीत कोंढव्याच्या सिंहगड सिटी स्कूलने पंडितराव आगाशे स्कूलवर ८ गडी राखून मात केली. अथर्व कामठेच्या हॅटट्रिकच्या जोरावर सिंहगड सिटी स्कूलने पंडितराव आगाशे स्कूलला निर्धारित १० षटकांत ५ बाद ५७ धावांत रोखले. यानंतर विजयी लक्ष्य ५.२ षटकांत २ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.

धावफलक : १७ वर्षांखालील मुले -१) सेंट फ्रान्सिस डिसेल्स स्कूल - १० षटकांत ५ बाद १०३ (सुशील म्हेत्रे २९, परेश मोसेस १३, स्वानंद शेवाळे १-१३, अनिमेष परदेशी १-२२) वि. वि. मॉडर्न हायस्कूल पुणे- ५ - १० षटकांत ९ बाद ५८ (स्वानंद शेवाळे १५, ओंकार नाईकोडी १०, परेश जैसवाल ४-२, आदित्य वाबळे १-२).

२) पंडितराव आगाशे स्कूल - १० षटकांत ५ बाद ५७ (ओम जाधव १३, अथर्व कामठे ३-५, तेजस तुळसणकर १-८) पराभूत वि. सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा झ्र ५.२ षटकांत २ बाद ६१ (तेजस तुळसणकर १६, तुषार खिलारे नाबाद १३, यश द्विवेदी १-१६, श्रीनिवास थोरात १-९).

३) अक्षरनंदन विद्यालय - १० षटकांत ३ बाद ५४ (अनिरुद्ध वैदू नाबाद ११, गणेश चौधरी १-४, नकुल दोडके १-११) पराभूत वि. एस. एस. अगरवाल स्कूल - ८.२ षटकांत ३ बाद ५५ (नकुल दोडके ९, मानस बर्वे ७, देवाशिष पाटील १-८, साहिल काटे १-१०).

दस्तूर होशांग स्कूलचा सुपर ओव्हरमध्ये विजय

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटात दस्तूर होशांग स्कूलने एस. पी. एम. इंग्लिश स्कूलचा सुपर ओव्हरमध्ये एका धावेने पराभव केला. यात एस. पी. एम. इंग्लिश स्कूलने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ९ बाद ५१ धावा केल्या. यानंतर दस्तूर स्कूलने १० षटकांत ९ बाद ५१ धावा करून बरोबरी साधली. यानंतर सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. यात दस्तूर स्कूलने १ षटकांत ९ धावा केल्या. एस. पी. एम. स्कूलला १ बाद ८ धावाच करता आल्या.

धावफलक : एस. पी. एम. इंग्लिश स्कूल - १० षटकांत ९ बाद ५१ (जय जाधव ७, श्रेयश गावडे ७, दिग्विजय पाटील २-९, आर्यमन फाळके २-७) बरोबरी वि. दस्तूर होशांग स्कूल - १० षटकांत ९ बाद ५१ (दिग्विजय पाटील २३, आर्यमन फाळके १२, शौनक परांजपे ३-८, आशिष पोरे १-१०). सुपर ओव्हर - दस्तूर स्कूल - १ षटकात ९ (दिग्विजय पाटील नाबाद ६, आर्यमन फाळके नाबाद ३) वि. वि. एस. पी. एम. स्कूल - १ षटकात १ बाद ८ (सोहम शिंदे नाबाद २, जय जाधव २).

18 Sep 2017

आंतरशालेय फूटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज - कॅलम हायस्कूल आणि सेंट मेरीज हायस्कूल यांच्यात जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महापालिकेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या गटाची अंतिम लढत रंगणार आहे.

येरवडा येथील डॉन बॉस्कोच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत कॅलम हायस्कूलने एंजल मिकी अँड मिनी हायस्कूलवर १-० ने मात केली. यात सिया दुग्गलने (१८ मि.) केलेला गोल निर्णायक ठरला. दुस-या उपांत्य लढतीत सेंट मेरीज हायस्कूलने कल्याणीनगरच्या बिशप्स स्कूलवर ३-० ने मात केली. सेंट मेरीजकडून आदिती रामकुमार (२ मि.), झिया पारवानी (१७ मि.) आणि सुरभी उपाध्याय (२४ मि.) यांनी गोल केले.

निकाल : १७ वर्षांखालील मुले - उप-उपांत्यपूर्व फेरी - १) जे. एन. पेटिट - २ (मैत्रेय आव्हाड १६ मि., वेदांत मुतकेकर २१ मि.) वि. वि. अमनोरा स्कूल - ०. २) सेंट पॅट्रिक्स स्कूल -१ (सिद्धार्थ नानावटी ७ मि.) वि. वि. श्यामराव कलमाडी हायस्कूल, एरंडवणा - ०. ३) सेंट जोसेफ हायस्कूल, घोरपडी - १ (नितीन नाना सानी २३ मि.) वि. वि. गुरुकुल हायस्कूल- ०. ४) नगरवाला डे स्कूल- २ (फरहान शेख ९ मि., योगेश शिंदे १६ मि.) वि. वि. स्टेला मारीस हायस्कूल - ०.

१४ वर्षांखालील मुले - उपांत्यपूर्व फेरी - १) द बिशप्स स्कूल, कॅम्प - १ (मोक्ष संघवी ६ मि.) वि. वि. डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल, औंध- ०. २) दिल्ली पब्लिक स्कूल - ३ (रियांश सत्रा ७ मि., अमीर एम. डी. १७ मि., विष्णू कुलकर्णी २४ मि.) वि. वि. सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड - ०. ३) लॉयला हायस्कूल - ३ (रोहन सोनार ८, २१ मि., राणाप्रताप देशमुख १६ मि.) वि. वि. स्टेला मारीस स्कूल- ०.

मुली - १) कॅलम हायस्कूल - ३ (सिया दुग्गल १७, २१ मि., आकांक्षा महापात्रा १० मि.) वि. वि. गुरुकुल रेंजहिल्स -०. २) सेंट मेरीज स्कूल - १ (झिया पारवानी २१ मि.) वि. वि. मिलेनियम नॅशनल स्कूल - ०.

16 Sep 2017

आंतरशालेय कबड्डी स्पर्धा

एमपीसी न्यूज - खाशाबा जाधव क्रीडानिकेतन, माउंट कार्मेल हायस्कूल, रावसाहेब पटवर्धन हायस्कूल यांनी संघांनी जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महापालिका शिक्षण विभाग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या गटात दुस-या फेरीचा अडथळा पार केला. 

स्वारगेट येथील नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील दुस-या फेरीत खाशाबा जाधव क्रीडानिकेतन संघाने खडकीच्या गुलबाई मुलुक इराणी कन्या प्रशालेचा २५-६ असा सहज पराभव केला. खाशाबा जाधव क्रीडानिकेतन संघाने मध्यंतरालाच १७-० अशी मोठी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला होता. खाशाबा जाधव संघाकडून प्रज्ञा थोपटे, शीतल कोळेकर यांनी चमक दाखवली, तर इराणी प्रशालेकडून रेश्मा मोरे उत्कृष्ट खेळाडू ठरली. दुसºया लढतीत माउंट कार्मेल हायस्कूलने विमलाबाई गरवारे हायस्कूलवर २१-४ अशी मात केली. माउंट कार्मेल हायस्कूलकडे मध्यंतराला १०-४ अशी आघाडी होती. माउंट कार्मेलच्या मिहिका तांबे, कांचन तरडे यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. विमलाबाई गरवारे हायस्कूलच्या समीक्षा भवरची लढत एकाकी ठरली.

तिस-या लढतीत रावसाहेब पटवर्धन हायस्कूलने अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलचा २९-२४ असा पराभव करून आगेकूच केली. रावसाहेब पटवर्धन हायस्कूलकडे मध्यंतराला १८-९ अशी आघाडी होती. पटवर्धन हायस्कूलच्या शिवांजली बोलाडे, संजिवनी राठोड या उत्कृष्ट खेळाडू ठरल्या. अँग्लो उर्दू हायस्कूलकडून रोजमिन शेख, आयशा सजन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. चौथ्या लढतीत सलोनी पवार, दिप्ती चौधरी यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर महिलाश्रम हायस्कूलने प्रियदर्शनी माध्यमिक विद्यामंदिरवर २६-६ अशी सहज मात केली.

निकाल : १७ वर्षांखालील मुली  १) अभिनव विद्यालय मराठी माध्यम - ३३ (उत्कृष्ट खेळाडू - प्राजक्ता कराळे, सानिका तापकीर) वि. वि. हुजूरपागा हायस्कूल, कात्रज -१८ (उत्कृष्ट खेळाडू - नेहा जाधव, दीक्षा पाटील)

२) विजयमाला कदम कन्या प्रशाला - ३३ (साक्षी पासलकर, दुर्वा देवळी) वि. वि. अग्रसेन हायस्कूल, येरवडा -३ (अनुष्का उलेकर)

३) विश्वकर्मा मराठी माध्यमिक विद्यालय, बिबवेवाडी - ३७ (समीक्षा कोल्हे, अक्षदा सुपेकर) वि. वि. पूज्य कस्तुरबा गांधी इंग्लिश माध्यमिक विद्यालय - ५ (वंदना यादव)

४) विश्वकर्मा इंग्लिश माध्यमिक, बिबवेवाडी - ४७ (श्रुतिका व्यवहारे, पूजा कोंगरी)  वि. वि. एरंडवणा माध्यमिक विद्यालय - १९ (सानिका खाडे, कोमल घाटे)

निकाल : १७ वर्षांखालील मुले -तिसरी फेरी - १) गेनबा मोझे प्रशाला - ४० (उत्कृष्ट खेळाडू - अभिषेक चव्हाण, सुजित पगडे) वि. वि. शानू पटेल विद्यालय - ३० (यश गायकवाड, अथर्व शिंदे)

२) बालवडकर विद्यालय - ३० (राहुल वाघमारे, एन. कांबळे) वि. वि. मुक्तांगण इंग्लिश मीडियम, सदाशिव पेठ -१९ (रोहन कांबळे, सौरव शिंदे)

३) मॉडर्न हायस्कूल, पाषाण - ३२ (तेजस काळभोर, जितेंद्र चौधरी) वि. वि. प्रेरणा माध्यमिक विद्यालय -१८ (आदित्य शेडगे)

४) श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय - २३ (हुमन यादव, ऋषी सराफ) वि. वि. तुकाराम पठारे विद्यालय -१२ (मयूर राठोड, कैलास जेडे)

५) वात्सल्य पब्लिक स्कूल - २९ (राज गुप्ता, विशाल शारू) वि. वि. रामभाऊ म्हाळगी हायस्कूल - २३ (अभिषेक धुमाळ, प्रथमेश पाटील).

15 Sep 2017


एमपीसी न्यूज -  राजेश वाधवान यांच्या मालकीच्या 
इंडियन सुपर लीगमधील  फ्रॅंचाईजी एफसी पुणे सिटी संघ व संघाचे मुख्य  प्रशिक्षक अँटोनिओ  हब्बास यांच्यातील करार संपुष्टात आला आहे. फ्रॅंचाईजीने परस्पर सामंजस्याने मुख्य प्रशिक्षक हब्बास तसेच सहाय्यक प्रशिक्षक मिग्युएल मार्टिनेझ गाेन्झालेझ यांचा करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला.

हब्बास दीड वर्ष एफसी पुणे सिटी संघाचे प्रशिक्षक हाेते. या कालावधीत त्यांनी केलेले काम नक्कीच समाधान देणारे हाेते. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा. नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड लवकरच केली जाईल, असेही फ्रॅंचाईजीने कळवले आहे.

हब्बास म्हणाले,एफसी पुणे सिटीबराेबरचा अनुभव विलक्षण हाेता. आता आयएसएलचा माेसम नव्या कार्यक्रमानुसार खूप लांबणार आहे. मी अन्य काही जणांना शब्द दिला असल्यामुळे मी एफसी पुणे सिटी संघासाेबत राहू शकणार नाही. दीड वर्षाच्या कालावधीत कंपनीते पदाधिकारी, व्यवस्थापन, खेळाडू या सगळ्यांनीच सहकार्य केले. मी त्यांचा सदैव आभारी राहिन. नव्या माेसमासाठी क्लबला माझ्या शुभेच्छा.

Page 1 of 29