• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Chinchwad : उद्योग वाढीसाठी नावीन्यपूर्ण कल्पना आवश्यक - डॉ. विश्‍वनाथ कराड


एमपीसी न्यूज - उद्योग वाढीसाठी नावीन्यपूर्ण कल्पनांची आवश्यक असल्याचे मत, एमआयटीचे अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (एआयआरआयए) पुणे विभागातर्फे आयोजित केलेल्या रबर, डाइज व मोल्डच्या प्रदर्शनाचे आज (बुधवारी) चिंचवड येथील ऑटोक्लस्टरमध्ये उद्‌घाटन करताना डॉ. कराड बोलत होते. सीडबीचे व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार, एआयआरआयएचे अध्यक्ष कुमार चौधरी, उपाध्यक्ष विक‘मकर, पश्‍चिम विभागाचे प्रमुख विनोद बन्सल, पुणे विभागाचे प्रमुख सुनील बन्सल, गुजरात विभागाचे प्रमुख जगदीश पटेल, या प्रदर्शनाचे संयोजक विनोद पटकोटीकर यावेळी उपस्थित होते.

डॉ. कराड पुढे म्हणाले की, विकासासाठी उद्योग आणि शिक्षण संस्थांमध्ये परस्पर समन्वय आवश्यक आहे. व्यवसायात नैतिक मूल्ये पाळली पाहिजेत. आपला देश ज्ञानाचे दालन म्हणून पुढे येत आहे. सुसंवाद आणि शांतीचा मंत्र जगाला देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी आपापल्या क्षेत्रात प्रत्येकाला महत्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

यानिमित्त विविध विषयांवरील व्याख्याने, परिसंवाद आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. रबर, डाय आणि मोल्डच्या या प्रदर्शनात शंभरहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. प्रदर्शन गुरुवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

Read 100 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn