• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Akurdi : जिल्हास्तरीय शालेय रोपमल्लखांब स्पर्धेत तनया सप्तश्वा प्रथम


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय मल्लखांब स्पर्धेत आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयाच्या तनया सप्तश्वाने प्रथम क्रमांक पटकावला.

निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात या स्पर्धा संपन्न झाल्या. 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघात तनयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तिची विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड झाली आहे. तनया अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. प्रशिक्षक तुषार भरगुडे यांच्याकडे ज्ञानप्रबोधिनीमध्ये ती प्रशिक्षण घेत आहे.

क्रीडा शिक्षक प्रा. अनिल दाहोत्रे यांनी मार्गदर्शन केले. तनया सप्तश्वाचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, मानद सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) आत्माराम जाधव, सहाय्यक सहसचिव डॉ एम. जी. चासकर, क्रीडाप्रमुख शाम भोसले, प्राचार्य अन्सार शेख, उपप्राचार्य बाबासाहेब शितोळे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Read 91 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn