• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : प्रथम राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलनात पर्यावरणप्रेमींचा सत्कार

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्था यांच्या वतीने पर्यावरण साहित्य संमेलन​ २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात पर्यावरण संवर्धनाच्या विविध कामात कार्यरत असलेल्या रवींद्र धारिया (वनराई), नीलेश इनामदार (एन्व्हायर्नमेंट क्लब ऑफ इंडिया)​ या पर्यावरण रक्षकांचा' डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पर्यावरण मित्र पुरस्कार​'देऊन सत्कार करण्यात आला. ​

विनोद बोधनकर (जलबिरादरी), ललीत राठी (जन आधार) यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी ​झाला. संमेलनाचे हे प्रथम वर्ष होते. कार्यक्रमाचे संयोजन संजय काळभोर (तेजस्विनी संस्था) यांनी केले. शामला देसाई समन्वयक होत्या.

Read 81 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn