• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना जाधवर इन्स्टिटयूटतर्फे जीवनगौरव पुरस्कार

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, शिक्षणतज्ज्ञ एन.सी.जोशी, पत्रकार सुरेश चव्हाणके मानकरी

एमपीसी न्यूज - शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या न-हे मानाजीनगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना शनिवारी,(दि. १६) दुपारी २ वाजता प्रा.डॉ.सुधाकर जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शार्दुल जाधवर, प्रा.अमित गोगावले उपस्थित होते. सन्मान सोहळ्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पुरस्कार, इन्स्टिटयूट ऑफ सायन्सचे एन.सी.जोशी यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार आणि सुदर्शन न्यूज चॅनलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके यांना पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. कार्यक्रमात संस्थेच्या सामाजिक कार्याचा अहवाल असलेले उडान भाग ३ या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तिंना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी कार्यक्रमाला जनता दल (यु) चे मुख्य महासचिव व राष्ट्रीय प्रवक्ता तसेच राज्यसभेचे माजी खासदार के.सी.त्यागी हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच आमदार भीमराव तापकीर, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. सुधाकरराव जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जाधवर परिवारात असलेल्या अठरा हजार विद्यार्थी व पालक आणि सातशेपेक्षा जास्त कर्मचा-यांना प्रेरणा मिळावी, याउद्देशाने सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरू असतात.

Read 139 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn