• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
12 Sep 2017

Pune : टाइम्स अॅण्ड ट्रेन्ड्स अकॅडमीची दोन दिवसीय कार्यशाळेची उत्साहात सांगता


एमपीसी न्यूज - टाइम्स अॅण्ड ट्रेन्ड्स अकॅडमी तर्फे व्हॉईस युअर आयडियाज विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेची सांगता नुकतीच पुणे येथील टाइम्स अँड ट्रेंड्स अकॅडमी येथे झाली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करावे या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अमित अग्रवाल यांनी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले. अग्रवाल म्हणाले की, केवळ प्रोफेशनल नव्हे तर वैयक्तिक यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा मंत्र आहे. आत्मविश्वासाची कमतरता ही निष्क्रियतेला कारणीभूत असते. विद्यर्थी आत्मविश्वासाच्या अभावी आपल्या जीवनातील उत्तम संधी गमावू शकतात. हा आत्मविश्वास कमी होऊ नये यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

आपल्या कामावर लक्ष ठेऊन काम केल्यास यश हमखास मिळते. मेहनतीच्या जोरावर आपण आपल्या आयुष्यातील बदल घडवू शकतो. ध्येय निश्चिती, सांघिक कार्य, वेळेचे नियोजन, चातुर्य, नेतृत्व यांसारखी कौशल्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मसात करावी, असे मत प्रांतिक पनिगर यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.

Read 132 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn