• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
12 Sep 2017

Pune : सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात भ्रष्टाचार करणा-यांवर तात्काळ कारवाई करा !


हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

एमपीसी न्यूज - सिंहगड किल्ल्याच्या डागडुजीसाठी 2012-2014 या काळात 1 कोटी 39 लाख रुपयांच्या खर्च केला आहे. परंतू संबंधित कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून यामध्ये भ्रष्टाचार केला आहे. या संदर्भातील अहवाल ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शिवाजीनगर, पुणे’ यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधितांना सादर केला आहे. त्यावर खुलासा मागवण्या व्यतिरीक्त शासनाने काहीही कारवाई केलेली नाही. शासनाने संबंधित कंत्राटदाराकडून भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम  व्याजासह वसुल करण्यात यावी आणि किल्ल्याचे बांधकाम चांगल्या कंत्राटदाराकडून तातडीने करुन घ्यावे अन्यथा शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना राज्यव्यापी आंदोलन छेडतील, अशी इशारा राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील सहभागी संघटनांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

या पत्रकार परिषदेला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख सचिन थोरात, सनातन संस्थेचे शंभु गवारे, हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले आणि या चळवळीचे समन्वयक प्रवीण नाईक उपस्थित होते. 

याप्रकरणात दोषी असलेल्या कंत्राटदार, प्रशासकीय अधिकारी यांना हेतूपुरस्सर पाठीशी घातले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत घालून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा. आणि बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून व्याजासह वसुल करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read 114 times