• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
12 Sep 2017

Akurdi : आकुर्डी येथे चित्रकला कार्यशाळा व प्रदर्शन उत्साहात संपन्न


एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील श्री सरस्वती माध्यमिक विद्यालय चित्रकला केंद्राच्या वतीने घेण्यात आलेली चित्रकला कार्यशाळा व प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.

यावेळी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे, संचालिका डॉ. अश्विनी दाभाडे, चित्रकार विशाल चोपडे, विशाल केदारी, वर्षा चराटे, विशाल बोडके, केंद्र संचालक गोविंद घोडके आदी उपस्थित होते.

चित्रकार व चित्रकला शिक्षकांनी चित्रांची प्रमाणबद्धता, रंगसंगती, रंगांच्या विविध छटा, स्टील लाईफ मेमरी, संकल्पचित्र व अक्षर लेखन अशा विविध बाबी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधून समजावून दिल्या. चित्रकलेतील बारकावे समजून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ३५० विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक संगीता गुरव यांनी केले. आभार गणेश भाने यांनी व्यक्त केले.

WhatsApp Image 2017 09 10 at 3.42.08 PM
WhatsApp Image 2017 09 10 at 3.44.01 PMRead 117 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn