• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
12 Sep 2017

Pimpri : मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त रविवारी विविध कार्यक्रम


एमपीसी न्यूज - मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंधसमिती, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.17) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेतील पक्षनेके एकनाथ पवार व मराठवाडा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी ही माहिती दिली.

रविवारी सकाळी आठ वाजता काळेवाडी येथील मराठवाडा मित्रमंडळाचे महाविद्यालयात महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झेंडावंदन होईल. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाचे सचिव शहाजी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी नऊ ते बारा या वेळात मराठवाडा कॉलेजपासून दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरी येथे कार्तिकी गायकवाडचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता प्रा. गजानन वाव्हळ यांचे व्याख्यान होईल. त्यानंतर बबनराव लोणी, सुजितसिंग ठाकूर, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, कमल घोलप, अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, यशदा बोईनवाड आदी उपस्थित राहणार आहे.

Read 90 times
Facebook Google Plus Twitter LinkedIn