• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
12 Sep 2017

सिध्दांत कॉलेजला दी बेस्ट प्रायव्हेट मॅनेजमेंट इन्स्टियूट इन अॅकॅडेमिक एक्सेलन्स इन इंडिया पुरस्कार


एमपीसी न्यूज - वर्ल्ड एज्युकेशन अॅण्ड स्कील कॉनकलेव्ह नवी दिल्ली यांच्यावतीने सिध्दांत कॉलजचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना दी बेस्ट प्रायव्हेट मॅनेजमेंट इन्स्टियूट इन अॅकॅडेमिक एक्सेलन्स इन इंडिया पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दिल्ली येथे झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या सेंटर फॉर एज्युकेशन ग्रोथ अॅण्ड रिसर्च नवी दिल्ली यानी केले होते. यावेळी सिध्दांत इन्स्टियूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे उपसंचालक डॉ.अतुल कुमार यांना नॅशनल एक्सेलेन्स अॅवॉर्ड त्यांच्या संशोधनाच्या कामगिरीसाठी देण्यात आला.

यावेळी एआयसीटीईचे सचिव ए.पी. मित्तल, के.आर. मंगलम युनिव्हर्सिटीचे कुलगुरु प्रो. के.के.अग्रवाल, महर्षि अरविंद युनिव्हर्सिटीचे कुलगुरु संजय पराशर, डॉ. सोनाली सिन्हा, प्रा.ए.के.पुरी आदी उपस्थित होते.

Read 59 times