• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
12 Sep 2017

Pimrpi : सफाई कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय


अ‍ॅड. सागर चरण युवा मंचचा उपक्रम

एमपीसी न्यूज - पिंपरीतील अ‍ॅड.सागर चरण युवा मंचच्या वतीने शैक्षणिक अर्थसहाय उपक्रमांतर्गत महापालिका सफाई कर्मचा-यांच्या दोन मुलांना प्रत्येकी ५० हजार रुपयांना धनादेश देण्यात आला. ही दोन्ही मुले अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत आहेत.

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्यावतीने स्वच्छता विषयक उत्कृष्ट काम करणा-या आरोग्य कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवनामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात पिंपरीचे महापौर नितीन काळजे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, किशोर चौतमोल, आरोग्य विभाग तक्रार निवारण समिती उपाध्यक्ष अ‍ॅड. सागर चरण उपस्थित होते.

या कार्यक्रमात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-या सफाई कर्मचा-यांचे पाल्य योगेश चावरे आणि मधु चावरीया यांचा विशेष सन्मान महापौर काळजे आणि महापौर चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आला. या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. अभिनेत्री प्रियंका यादव म्हणाल्या, सफाई कामगारांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन समाज उन्नतीसाठी पुढे आले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती केली पाहिजे. अभिनेत्री राधिका पाटील म्हणाल्या, अ‍ॅड.सागर चरण युवा मंचचा उपक्रम कौतुकास्पद आहे. आरोग्य, सफाई कामगारांच्या कल्याणासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे.

Read 107 times