• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
29 Jun 2017

जगात प्रत्येक सहावा पुरुष प्रॉस्टेट कॅन्सर बाधित


इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरतर्फे मोफत निदान शिबिर

एमपीसी न्यूज - इंडियन नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार प्रॉस्टेट कॅन्सर बाधित पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रामुख्याने 50 वर्षे वयानंतरच्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर मोठ्या प्रमाणात आढळतो. हा कॅन्सर जगभरातील पुरुषांच्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण ठरला आहे. तसेच दुर्देवाची बाब म्हणजे जगातील प्रत्येक सहावा पुरुष प्रॉस्टेट कॅन्सरबाधित आहे. यासाठी इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सर (IPC) मागील 3 वर्षांपासून प्रॉस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आज जगभरातील विकसित देशांमध्ये डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनच्या माध्यमातून कॅन्सरबद्दल जागरूकता होत आहे. मात्र, भारतात प्रॉस्टेट कॅन्सरबाबत आज देखील तितकीशी जागरूकता नाही. जवळपास 60 टक्के रुग्ण डॉक्टरांना कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात भेटतात. इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सर या संस्थेने यासाठी 100 पेक्षा अधिक शिबिरांच्या माध्यमातून 22 हजारपेक्षा जास्त लोकांमध्ये जनजागृती केली आहे.

वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे ही कॅन्सरची प्राथमिक लक्षणे आहेत. कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो. भविष्यात प्रॉस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 50 वर्षांपूढील पुरुषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये, असे देखील सुचविण्यात आले आहे.

जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: 50 वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. पूर्व निदानातून प्रॉस्टेट कॅन्सर असल्याचे आढळले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयूएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श निदान प्रक्रिया समजली जाते. एमआरआयद्वारे कॅन्सरचे अधिक अचूक निदान होऊ शकते.

प्रॉस्टेट कॅन्सरबाबत 3 ते 13 जुलैदरम्यान पूर्व नियोजित भेट ठरवून निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ज्ञांची भेट घेण्यासाठी रुग्णांना 020-66037777 / 78 या क्रमांकावर किंवा www.instituteforprostratecancer.co.in या संकेतस्थळावर भेट देता येणार आहे. This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. या मेलवर देखील संपर्क साधता येणार आहे.

Read 182 times Last modified on Thursday, 29 June 2017 11:08