• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

विश्वांजली गायकवाड हिचा बुधवारी गुणगौरव समितीतर्फे सत्कार


एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरवासीय गुणगौरव समितीच्या वतीने युपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात पहिली व देशात 11 वी आलेल्या विश्वांजली गायकवाड हिचा गुणगौरव आयोजित करण्यात आला आहे.


पिंपरी येथील मंगलसेन बहल विरंगुळा केंद्रात बुधवारी (दि. 21)  सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार असणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, विरोधी पक्षनेते योगेश बहल आदी उपस्थित असणार आहे.

याचवेळी दहावी परीक्षेमध्ये 100 टक्के गुण प्राप्त केलेल्या पिंपरी-चिंचवडमधील समृद्धी पुरोहित तर राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्थान पुरस्कार प्राप्त पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड. लक्ष्मण रानवडे, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेले पिंपरी-चिंचवडचे भूषण जगन्नाथ उर्फ आप्पा काटे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

Read 131 times Last modified on Monday, 19 June 2017 11:42
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start