• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

यापुढे शाळा, महाविद्यालयांकडून घरगुती दराप्रमाणे वीज बील आकारण्यात येणार


एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांकडून यापुढे घरगुती दराप्रमाणे वीज बिल आकारण्यात येणार आहे. महावितरणचे पुणे विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. महावितरण शाळा, महाविद्यालयांकडून व्यावासयिक दराने वीज बील आकारत होते. गेल्या अनेक दिवसांपासून शाळा, महाविद्यालयांकडून घरगुती दराप्रमाणे वीज बील आकारण्याची मागणी होत होती.

जिल्हा पुरवठा अधिकारी आणि ग्राहक संरक्षण समितीची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळा, महाविद्यालयांकडून घरगुती दराप्रमाणे वीज बील आकारण्याची मागणी अशासकीय सदस्य तुषार झेंडे यांनी केली. त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊन महावितरणचे अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर यांनी घरगुती दराप्रमाणे शाळा, महाविद्यालयांकडून वीज बील आकारण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे तातडीचे परिपत्रक त्यांनी जारी केले.

पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयांकडून घरगुती दराप्रमाणे वीज बील आकारण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना केल्या आहेत. या निर्णयाचा अनेक शाळा, महाविद्यालयांना फायदा होणार आहे. शाळा, महाविद्यालयांकडून व्यासायिक दराने वीज बील आकारले जात होते. वीज बील न भरल्यामुळे अनेक शाळांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आल्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्याचबरोबर महापालिकेकडून देखील शाळांकडून व्यावासायिक दरानेच कर आकाराणी केली जात आहे. व्यावसायिक दराच्या वीज बील आणि कर आकारणीमुळे काही संस्था चालक मेटाकुटीला आले होते. तसेच कर न भरल्यामुळे पालिकेकडून तर अनेक शाळांवर जप्तीची कारवाई देखील करण्यात आली आहे. महावितरणने शाळा, महाविद्यालयांकडून घरगुती दराने वीज आकारण्याचा निर्णय घेतल्याने संस्था चालकांना वीज बिलातून दिलासा मिळाला आहे.

Read 69 times Last modified on Monday, 19 June 2017 11:28
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start