• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

राज्यातील कला व शारीरिक शिक्षण शिक्षकांचा शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा


एमपीसी न्यूज - राज्यातील शाळांमध्ये कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या चार तासिका कमी करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यस्तरीय कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीने शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

28 एप्रिल 2017 ला राज्यातील शाळांमध्ये कला व शारीरिक शिक्षण या विषयांच्या चार तासिका  कमी करण्याचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे असलेले कला व शारीरिक शिक्षण हे विषय या दोन तासिकांमध्ये शिकवणे अवघड असल्याचे मत शिक्षकांचे आहे. त्यामुळे शासनाने काढलेले हे परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी  राज्यस्तरीय कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीचे वतीने आज दुपारी 12.30 वाजता 15 ऑगस्ट चौक ते  शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे चार ते पाच हजार कला व शारीरिक शिक्षण शिक्षक तसेच सर्व शिक्षक आमदार उपस्थित होते.

Read 71 times Last modified on Monday, 19 June 2017 11:29
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start