• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

पुणे बार असोसिएशनतर्फे वारकऱ्यांना खाऊ वाटप

पुण्याच्या खंडपीठासाठी माऊली चरणी प्राथना

एमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालखीचे रविवारी सायंकाळी पुण्यात आगमन झाले. यावेळी लाखो वैष्णव भक्त या वारीत सहभागी झाले होते. वारकऱ्यांचे आळंदी व देहू येथून पुण्यात आगमन झाल्यावर पुणे बार असोसिएशन व पुणे लॉयर्स कझुमर्स असोसिएशनतर्फे संचेती चौक येथे त्याचे स्वागत करण्यात आले. वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी मंडप टाकण्यात आला होता. तसेच त्याच्यासाठी बिस्किट व लाडूचे वाटप करण्यात आले.


यावेळी माउली चरणी पुण्यात लवकरात लवकर उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, अशी प्राथना करण्यात आली. यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, हेमंत झंझाड, विवेक पायगुडे, उकार चव्हाण, स्वप्नील काळे, सुहास फराडे तसेच पुणे लॉयर्स कंझुमर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मासाळ, नंदकुमार टीके, निवेदिता काळे, पांडूरंग ढोरे उपस्थित होते.

Read 88 times Last modified on Sunday, 18 June 2017 15:15
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start