• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Jun 2017

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम होणे गरजेचे - महापौर काळजे

एमपीसी न्यूज- आदिवासी बांधव कला व संस्कृती जोपासत असून त्याचे संवर्धन करण्यासाठी तसेच समाज एकत्र येऊन समाजात जागृती निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणे आवश्यक आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कला आणि सांस्कृतिक धोरणांतर्गत आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आज (रविवारी) महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्य लक्ष्मण उंडे, विलास मडेगेरी, विकास डोळस, नगरसदस्या उषा मुंढे, भिमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, यशोदा बोईनवाड, अनुराधा गोरखे, प्रियांका बारसे, माजी नगरसदस्या आशा सुपे आदी उपस्थित होते.

महापौर काळजे म्हणाले की, आदिवासी संस्कृती लोप पावत आहे. ती जोपासण्यसाठी, आदिवासी संस्कृतीतील कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन अशा कार्यक्रमांचे वेळोवेळी आयोजन करणे गरजेचे  आहे, असे मत काळजे यांनी व्यक्त केले.

या महोत्सवानिमित्त सकाळी 10.00 वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंत शोभा यात्रा काढण्यात आली. तसेच दुपारी 12.00 वाजता सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मधुकर तळपाडे व आदिवासी विचारवंत संतोष साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच  दुपारी 2.00 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 5.00 वाजता आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी व रमेश भोसले यांनी केले तर आभार प्रा.मुक्ता अंभिरे यांनी मानले.

Read 78 times Last modified on Sunday, 18 June 2017 14:15
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start